FDA  Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: 'एफडीए'ची मोठी कारवाई! हणजूण, हडफडेत तपासणी! 9 आस्थापनांना ठोकले टाळे

FDA Raid At Anjuna Arpora: हणजूण व हडफडेमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १८ रेस्टॉरन्ट आणि फास्टफूड आस्थापनांची तपासणी केली.

Sameer Panditrao

पणजी: हणजूण व हडफडेमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी १८ रेस्टॉरन्ट आणि फास्टफूड आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये ९ आस्थापनांच्या मालकांनी स्वच्छता आणि एफडीएच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्या आस्थापनांना टाळे ठोकण्याचे निर्देश प्रशासन संचालक श्वेता देसाई दिले आहेत.

एफडीच्या संचालिका श्‍वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर गोवा अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, अन्न सुरक्षा अधिकारी अमीत मांद्रेकर, लेनीन डिसा व इतरांनी ही कारवाई केली. सध्या एफडीएने किनारपट्टीतील अन्न गुणवत्ता आणि स्वच्छतेची तपासणीची मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळी अन्न व औषधे प्रशासनाच्या पथकाने हडफडे आणि हणजूणमध्ये स्वच्छता निरीक्षण मोहीम राबवली.

उडपी रेस्टॉरन्ट, बिर्याणी, फास्टफूड व खाद्यपदार्थ विक्री आस्थापनांची पणजी तपासणी केली. एकूण १८ आस्थापनांचा यामध्ये समावेश होता. त्यातील ९ मध्ये नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित आस्थापने बंद करण्याचा आदेश देसाई यांनी दिले.

हणजुणे येथील राइस बाउल रेस्टॉरंट, टेस्ट ऑफ इंडिया एनआर स्टारको जंक्शन, दम हैदराबादी बिर्याणी रेस्टॉरंट, अन्नपूर्णा रेस्टॉरंट आणि फास्ट फूड, चेन्नई मुरुगन रेस्टॉरंट, दिशांत कॅफे, अफलातून रेस्टॉरंट, नम्मा दक्षिण, बनारसी पाणीपुरी फूड कार्ट, जय गणेश जनरल स्टोअर्स, कैलाश जनरल स्टोअर्स, अंजुना २१ रेस्टॉरंट, तर हडफडे येथील एबीआर रेस्टॉरंट, हैदराबादी दम बिर्याणी रेस्टॉरंट, जय माताजी सुपर मार्केट, राठोड जनरल स्टोअर्स, मुनिराज स्वीट मार्ट यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'जीवन गेला तरी चालेल, पण रील बनलीच पाहिजे', जोडप्याने कालव्यात घेतली उडी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

AI Market: अमेरिकेला मागे टाकून भारत बनणार AI ची सर्वात मोठी बाजारपेठ; चॅटजीपीटीच्या CEO चं मोठं वक्तव्य

Train Robbery: कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लाटणारा सराईत चोरटा जेरबंद; 12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT