Mobile thieves Dainik Gomantak
गोवा

Sunburn And New Year Celebration: मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांच्या हाती लागले मोठे 'घबाड'

हणजुणात 9 तर कळंगुटमध्ये 55 मोबाईल जप्त

Rajat Sawant

फेसाळणाऱ्या किनाऱ्यांची रंगत, तरुणाईला आकर्षित करणाऱ्या पार्ट्यांचा जल्लोष आणि सेलिब्रेशनचा मनसोक्त आनंद देणारा गोवा आता जगभरातील पर्यटकांचे आवडते सेलिब्रेशन डेस्टिनेशन झाला आहे. साहजिकच ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक  गोव्यात दाखल झाले. यासोबतच चोरटे आणि ड्रग्स विक्रेतेही आल्याचे समोर आले आहे. कळंगुट आणि हणजुण पोलिसांनी मोबाईल चोरट्यांवर कारवाई करत गजाआड केले आहे. या कारवाईत हणजुण पोलिसांनी वेगवेगळ्या ब्रँडचे 9 मोबाईल तर कळंगुट पोलिसांनी 55 मोबाईल जप्त केले आहेत.

वागातोर येथे सनबर्न फेस्टिव्हलच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला चोरांच्या टोळ्या कार्यरत असल्याची माहिती हणजुण पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे हणजुण पोलिसांनी मोहिम राबवत चोरट्यांचा तपास सुरु करण्यात आला. तपासादरम्यान एक संशयित व्यक्ती आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ वेगवेगळ्या ब्रँडचे 9 मोबाईल आढळून आले. यावेळी संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेला संशयिताचे नाव सिराज अहमद शेख आहे. तो महाराष्ट्रातील मुंबई येथील आहे. तक्रारीमध्ये नमूद केलेले मोबाईलचे आयएमईआय नंबर आणि चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय नंबर चेक केले असता सेम टू सेम आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडील 9 मोबाईल जप्त केले. आतापर्यंत एकूण जप्त झालेल्या मोबाईलची संख्या ४० वर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेली मोबाईल चोरणारी टोळीचे 18 आरोपी हणजुणच्या पोलिस कोठडीत आहेत.

दुसरी कारवाई कळंगुट पोलिसांनी केली आहे. या कारवाईत 12 मोबाईल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे 55 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे बाजारमूल्य 15 लाख रुपये एवढे आहे. पोलिसांच्या तपासणी दरम्यान 12 जणांची टोळी कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ मोबाईल फोन आढळून आले.

शनिवारच्या कारवाईत रशीद मुल्ला(२१) (रा. आसगाव. मूळ : कुमारगंज-पश्चिम बंगाल, मजीद मिया (२९) बोडकोवड-कळंगुट, मुळ तुफानगंज-पश्चिम बंगाल, मिनरफ मुल्ला (२९) रा. कळंगुट, मूळ कुमारगंज (पश्चिम बंगाल), आदील मलीक (१९) चांदनी महल (दिल्ली), अरविंद गायकवाड (३७), अंबरनाथ-मुंबई, अजय जाधव (४०) भांडुप-मुंबई, खरीजून इस्लाम मुल्ला (३४), कुमार गंज (पश्चिम बंगाल), रहमान जलाउद्दीन अन्सारी (२१) मानखुर्द-मुंबई, मुरली विजय सिंग (१९) उत्तर-प्रदेश, मोहम्मद शबाझ मंजुरी (२७) सेलामपुर-दिल्ली, नाशीत शेख (३४) शिवाजी नगर- मुंबई, सांतु मुल्ला (२२) रा. माड्डोवाडा-कळंगुट मूळ कुमारगंज (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

SCROLL FOR NEXT