Anju and Nasrullah love story 
गोवा

लव्ह के लिए कुछ भी करेगा! गोव्याला जातेय सांगत नवऱ्याला सोडून राजस्थानची अंजू पाकिस्तानला पळाली

अंजू 22 जुलैपर्यंत पतीशी व्हॉट्सअ‍ॅपवर बोलत राहिली, मात्र ती कुठे आहे हे त्याला कळू दिले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Anju and Nasrullah love story

अलीकडेच पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरच्या लव्हस्टोरीनंतर आता भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची लव्हस्टोरी चर्चेत आहे. सीमा हैदर तिचा प्रियकर सचिनला भेटण्यासाठी पाकिस्तानातून नोएडात आली होती, तर अंजू तिच्या कथित प्रियकर नसरुल्ला याला भेटण्यासाठी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून पाकिस्तानात पोहोचली आहे.

सीमा हैदर प्रकरण सध्या वादात सापडले असून, त्याबाबत विविध यंत्रणा तपास करत आहेत. पोलिसांपासून ते आयबीपर्यंत त्यांना या कथेतील गुंता आजतागायत सोडवता आलेला नाही. अंजूच्या लव्हस्टोरीबाबत अनेक खुलासे समोर आले आहेत.

20 जुलै रोजी अंजू घरातून बाहेर पडली त्यावेळी नवऱ्याने तिला कुठे चालली आहेस? असे विचारले त्याव जयपूरला निघाल्याचे तिने सांगितले. पण, अंजू जयपूरला नव्हे तर दिल्लीला जाणार होती. एवढेच नव्हे तर अंजू काम करत असलेल्या कंपनीत ती गोव्याला जात असल्याचे सांगितले.

अंजूने मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगत दिल्लीला रवाना झाली. असे वारंवार खोटे बोलून माझी पत्नी माझ्याशी खोटे बोलून भिवडीहून पाकिस्तानात पोहोचली. अशी माहिती तिचा पती अरविंदने दैनिक भास्करला दिली. विशेष म्हणजे अंजू 22 जुलैपर्यंत पतीशी व्हॉट्सअ‍ॅपवर बोलत राहिली, मात्र ती कुठे आहे हे त्याला कळू दिले नाही.

मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील नसरुल्ला आणि अंजू या दोघांनी ते एकमेकांवर प्रेम करतात असे पोलिसांना सांगितले. त्यांना लग्न करायचे आहे म्हणून ती पाकिस्तानात भेटायला आली आहे, असे सांगितले. अंजूने स्वतःला ख्रिश्चन धर्मातील घटस्फोटित महिला असल्याचे सांगितले.

प्रेमासाठी पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूचे पती अरविंद यांनी भास्करला दिलेल्या माहितीनुसार, अंजूचे पती अरविंद दोघांनी 2007 मध्ये लग्न केले होते. अरविंद ख्रिश्चन, तर अंजू हिंदू होती. अंजूने लग्नानंतर धर्म बदलला. अशी माहिती समोर आली आहे.

2020 मध्ये अंजू (34) हिची पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील नसरुल्ला (29) फेसबुकवर मैत्री झाली. फेसबुकवरून दोघांचे व्हॉट्सअॅप कनेक्शन झाले. त्यातून दोघांचे प्रेम झाले. अंजूला 15 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगा आहे.

अंजू अनेक दिवसांपासून पाकिस्तानात जाण्याचा प्लॅन करत होती. तीन वर्षांपासून अंजू नसरुल्लाहच्या संपर्कात होती. 2020 मध्ये अंजूने पासपोर्ट बनवला होता. 21 जून रोजी अंजूने पाकिस्तानमधील लग्नाला उपस्थित राहण्याचे कारण देत व्हिसासाठी अर्ज केला. मित्राला भेटण्यासाठी लाहोरला जात असल्याचे तिने पती अरविंदला सांगितले. दरम्यान, लाहोर पाकिस्तानात आहे हे तिच्या पतीलाही माहीत नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT