संदेश अमोणकर
संदेश अमोणकर 
गोवा

भटक्या प्राण्यांना अनेकांचा लाभतो आधार

Dainik Gomantak

प्राची नाईक,

पणजी,
कोरोना विषाणूचा संसर्ग जसा जसा वाढू लागला त्यासोबत अनेक गैरसमज समाजात पसरू लागले. यातील एक म्हणजे हा विषाणू जनावरांपासून पसरतो, त्यामुळे घरातील पाळीव प्राणी रस्त्यावर आले आणि भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली. ज्या दिवसांत माणसांना अन्न पाणी मिळवणे कठिण झाले तिथे या जनावरांचे आणखीन हाल होवू लागले. सगळी माणसे घरातच असल्यामुळे रस्त्यावरील भटक्या जनावरांना
अन्न मिळणार कुठून?
अशा परस्थितीमध्ये अनेक स्वयंसेवी संघटना, स्वयंसेवक तसेच सामान्य नागरिक आपआपल्या परीने जमेल तशी या मुक्या प्राण्यांची सोय करीत आहेत. अनेक जण विविध सोशल मीडिया माध्यमांद्वारे मदतीसाठी आव्हान करत आहेत. कुठे प्राण्यांसाठी असलेले खाद्य मिळत आहे का अशी चौकशी ही होत आहे. या सोबत गस्तीवर असलेल्या पोलिसांही यांना खाद्य देत आहेत. शाळा, महाविद्यालय, औद्योगिक वसाहती, हॉटेल असलेल्या ठिकाणी अनेक भटकी कुत्री तसेच गुरांचा ढेरा असतोच. अशा ठिकाणी कॅन्टीन किंवा लोकांनी टाकलेले अन्न ही जनावरे खायची. पण लॉक डाऊन मुळे आता हे सगळे बंद असल्यामुळे या ठिकाणी असलेल्या प्राण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे अनेक संस्था पुढे येवून कार्य करीत आहेत.
तालुक्यातील पिपल फॉर अॅनिमलस  ही गैर सरकारी संस्था सक्रियपणे या दिवसांत या भटक्या कुत्र्यांसाठी जेवण पुरवण्याचे काम करत आहे. " आमची संस्था संपूर्ण दिवसभर भटक्या कुत्र्यांसाठी जेवण बनवते. यात भात, त्यासोबत चिकन, पेडिग्री किंवा अंड्याचा समावेश असतो. यासाठी आम्हाला  अॅनिमल
लव्हर्स ; या वॉट्सऍप गटाची फार मदत लाभते. आमचे कार्यकर्ते तसेच या गटाचे सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी जसे बोरी, उजगाव, कुर्टी अशा फोंड्यातील अनेक भागातील जवळपास २५० कुत्र्यांना जेवण घालण्याचे काम करतात. यासोबत बांदोडा येथिल काही कार्यकर्ते फलोत्पादन केंद्रातून टाकावू भाज्या गोळा
करून ते गुरांना घालतात. पिपल फॉर अॅनिमल या संस्थेच्या संचालिका सरिता परब यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT