angnwadi fatorda Dainik Gomantak
गोवा

Fatorda News : अंगणवाडी भाडे 8 महिने थकले ; आठवड्यात भाडे जमा करा अधिकाऱ्यांचे आश्वासन

सचिन सातार्डेकर यांनी सांगितले की, फेब्रुवारीपासून मागील आठ महिने महिला व बालकल्याण खात्याकडून भाड्याची रक्कम अदा केलेली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Fatorda News : फातोर्डा, सासष्टीतील अनेक बालवाडी व अंगणवाडी भाडेपट्टीवर घेतलेल्या खोल्यांत भरविल्या जातात. मात्र, महिला व बालकल्याण खात्याने मागील आठ महिने भाडे फेडलेले नाही. त्यामुळे काही खोली मालक हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, मडगाव येथील विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यापर्यंत भाडे जमा होईल, असे आश्वासन या खोली मालकांना दिले आहे.

महिला व बालकल्याण खात्याकडून बालवाडी व अंगणवाडी या अनेक ठिकाणी भाड्याच्या खोल्यांतून चालवण्यात येत आहेत. यापूर्वी अंगणवाडी व बालवाडीसाठी भाड्याने घेतलेल्या जागांना ४ हजार रुपयांचे भाडे दिले जात होते.

मात्र, फेब्रुवारीपासून या भाड्यामध्ये दोन हजारांची वाढ करत हे भाडे सहा हजार करण्यात आले आहे. मात्र, भाडेवाढ केल्यापासून खोली मालकांना भाड्याची रक्कम मिळालेली नाही.

याबाबत मडगाव येथील सचिन सातार्डेकर यांनी सांगितले की, फेब्रुवारीपासून मागील आठ महिने महिला व बालकल्याण खात्याकडून भाड्याची रक्कम अदा केलेली नाही.

गणेश चतुर्थीसारखा मोठा सण होऊन गेला, त्यावेळी तरी दोन ते तीन महिन्यांचे भाडे मिळाले असते तर जागा मालकांना थोडा दिलासा मिळाला असता. काही ठिकाणी अंगणवाडी सेविका आपल्याकडील पैसे जागा मालकाला देत अंगणवाडी चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या सर्व प्रश्नांवर महिला व बालकल्याण खात्याकडून लक्ष देण्याची गरज आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दोन महिन्यांचा पगार न दिल्यास ते आंदोलनाचा मार्ग स्वीकारतात, मग जागा मालकांनी भाड्याविना दिवस काढायचे का, असा सवाल सातार्डेकर यांनी केला.

निधीची कमतरता असल्यास प्रत्येक महिन्याला शक्य न झाल्यास दोन ते तीन महिन्यांनी तरी भाडे खात्यात जमा करण्याची गरज आहे.

मडगावातील कार्यालयात विचारणा केली असता बिले पणजी कार्यालयात पाठवल्याचे सांगितले जाते. पण भाडे न येण्याचे कारण काहीही सांगितले जात नाही, असे सातार्डेकर म्हणाले.

तांत्रिक अडचणीमुळे विलंब

मडगाव कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, जागा मालकांचे भाडे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाड्यासाठीचा निधी प्राप्त झालेला आहे. काही तांत्रिक अडचणी असल्याने भाड्याचे पैसे देण्यात विलंब झाला. पुढील आठवड्यापर्यंत त्यांना भाड्याचे पैसे मिळतील, असे स्पष्ट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT