Anganwadi children education through e-learning, says Vishwajit Rane 
गोवा

अंगणवाडीतील मुलांना डिजिटल शिक्षण देणार; सत्तरी, डिचोली, फोंडा तालुक्‍यांत प्रायोगिक तत्त्‍वावर उपक्रम

विलास ओहाळ

पणजी: प्राथमिक शाळांच्या मुलांच्या हातात ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल आला. आता अंगणवाडी डिजिटायझेशनमुळे ३ वर्षांच्या मुलाच्या हातात आता टॅब पडणार आहे. अंगणवाडीतील मुलांना डिजिटायझेशन शिक्षण दिले जाणार असून, महिला व बालकल्याण खात्याच्यावतीने तीन तालुक्यांत लवकरच हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

महिला व बाल खात्याने कन्व्‍हेजिनियस या कंपनीच्या सहकार्याने डिजिटायझिंग अंगणवाडीचे शिक्षण कसे असणार याची माहिती आज मुख्यसेविका आणि बालविकास संरक्षण अधिकारी (सीडीपीओ) म्हणून काम करणाऱ्या महिलांना देण्यात आली. त्यासाठी पुढील काही दिवसांत अंगणवाडी सेविकांना याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

लहान मुलांना अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना बालपणापासून डिजिटल शिक्षण मिळावे, असा मनोदय अनेकवेळा मंत्री विश्‍वजित राणे यांनी बोलून दाखवला होता. आता हा उपक्रम सत्यात उतरवला जाणार आहे. सध्या कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाद्वारे प्राथमिकपासून महाविद्यालयांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोबाईल किंवा संगणक अशा उपलब्ध साधनांचा वापर करावा लागत आहे. मुलांच्या मुल्यविकासासाठी काम करणारी कॉन्विजिनियस ही कंपनी या उपक्रमासाठी मदत करणार आहे.

अंगणवाडीतील मुलांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी प्रायोगिक तत्त्‍वावर सत्तरी, डिचोली आणि फोंडा या तीन तालुक्यांची निवड केली आहे. अंगणवाडीत येणाऱ्या मुलांचा वयोगट पाहता ३, ४ आणि ५ वर्षांच्या मुलांसाठी विकसित केलेल्या अॅपद्वारे शिक्षण दिले जाईल. अंगणवाडीत दूरदर्शन संच असेल त्यानुसार अंगणवाडी शिक्षिका मुलांना टॅबद्वारे शिक्षित करतील. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत १५ टॅब दिले जातील. मुलांना वयानुसार तयार केलेले प्रोग्राम टॅबवर पाहायला मिळणार आहेत. ४० ते ४२ अंगणवाड्यांमध्ये हा उपक्रम सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्‍यान, ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या घटना घडत आहेत. लहानवयात टॅबसारख्या वस्तू हातात पडणार असतील, तर मुलांना डोळ्यांचे आजार उद्‍भवू शकतात. एवढ्या लहान वयातील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नयेत, असे मत ज्‍येष्‍ठ शैक्षणिक अभ्‍यास तज्ज्ञ पांडुरंग नाडकर्णी यांनी व्‍यक्त केले.

अंगणवाडीतील मुलांच्या शिक्षणासाठी जी संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार केली आहे, ती केंद्रीय मंत्रालयाच्या अर्ली चाइल्डहुड चिल्ड्रन एज्युकेशनच्‍या (ईसीसीई) मार्गदर्शक सूचनांनुसार केली आहे. ही संगणक प्रणाली इंग्रजी व कोकणी भाषेत उपलब्ध आहे. - विश्‍वजित राणे, महिला व बाल कल्याण मंत्री. 


 

संपादन: ओंकार जोशी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी होणार, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार; मुख्यमंत्र्यांची तंबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

SCROLL FOR NEXT