Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

BJP Foundation Day:...आणि ब्रश हाती घेऊन मुख्यमंत्री सावंतांनी 'कमळ'मध्ये भरले रंग

भाजप स्थापना दिनानिमित्ताने देशात 'सोशल जस्टीस वीक' साजरा करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय जनाता पक्षाचा स्थापना दिवस गोव्यात उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील भाजप नेते यांनी विविध ठिकाणी कार्यक्रम घेत स्थापना दिवस साजरा केला. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील हातात ब्रश घेत भिंतीवर पक्षाचे 'कमळ' रंगवले.

यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानावडे उपस्थित होते. भाजप स्थापना दिनानिमित्ताने देशात 'सोशल जस्टीस वीक' साजरा करण्यात येत आहे. 06 ते 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. दरम्यान, पक्ष स्थापना दिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी कुंचला हाती घेतल्याचे पाहायला मिळाले.

ख्रिस्ती मतदारांचे प्राबल्य असलेल्या कुडतरी मतदारसंघात आज स्थानिक भाजप मंडळातर्फे पहिल्यांदाच भाजप पक्ष स्थापना दिवस साजरा केला. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमात नुवेचे आमदार आलेक्स सिकेरा यांनीही भाग घेतला.

सिकेरा यांच्या निवासस्थानी ध्वज वंदन करण्यात आले. यावेळी एसटी मोर्चा उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी भाजप पक्षांची स्थापना करणाऱ्या संस्थापकाना आदरांजली वाहिली.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश आता प्रगती पथावर मार्गक्रमण करत असून गोव्यात डॉ. प्रमोद सावंत आणि सदानंद तानावडे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष तळागळपर्यंत पोहोचला असून सर्व घटकांना विकासाच्या मुख्य धारेत आणण्याचे प्रयत्न गोव्यात चालू असल्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे अभिनंदन केले. यावेळी महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत यांचेही भाषण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT