Accident in Sakhali Goa Dainik Gomantak
गोवा

रुग्णवाहिकेची कारला जोरदार धडक, तिघे गंभीर

साखळीजवळ भीषण अपघात, कारमधील तिन्ही जखमींवर गोमेकॉमध्ये उपचार सुरु

दैनिक गोमन्तक

साखळी : साखळी येथे 108 रुग्णवाहिका आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. (Sakhali Accident News Updates)

होंडा येथे झालेल्या अपघातस्थळी जाताना वाटेत रुग्णवाहिकेची कारला धडक बसून अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही दुसऱ्या रुग्णवाहिकेतून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (GMC) रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान आर्लेम सर्कलजवळ दोन चारचाकी वाहनांची टक्कर झाली आणि दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात (Accident) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला होता. या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी वाहनचालकांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मायणा कुडतरी पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून दोन्ही वाहने अपघातस्थळावरून हटविण्यात आली. या अपघातामुळे येथे काही काळासाठी वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT