Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: 70 फूट खोल विहिरीत पडला वृद्ध; अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवला जीव

उपचारासाठी हळदोणा आरोग्य केंद्रात दाखल

दैनिक गोमन्तक डिजिटल

Mapusa: कारोणा-हळदोणा येथे तोल जाऊन 70 फूट खोल विहिरीत पडलेल्या एका वृद्ध इसमाला म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. माळू विठोबा गावडे (62, मूळ कर्नाटक) असे या वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री 12.10 वा.च्या सुमारास घडली.

गावडे हे आपल्या भावासमवेत भाड्याच्या घरात राहात होते. घराच्या बाजूने जाताना कडेला असलेल्या विहिरीत तोल जाऊन ते पडले.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सिडी व दोरीच्या साहाय्याने जवान स्वप्नेश कळंगुटकर व अक्षय सावंत हे या खोल विहिरीत उतरले.

तर दलाचे उपअधिकारी अशोक परब, भगवान पाळणी, श्रीनाथ नर्से व साईदत्त आरोलकर या जवानांच्या मदतीने गावडे यांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत माळू गावडे यांच्या डाव्या हाताला मोठी जखम झाली आहे. त्यांच्यावर हळदोणा आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT