MAPUSA MUNICIPAL COUNCIL Dainik Gomantak
गोवा

Goa Government: नगराध्यक्षांवर सत्ताधारीच नाराज!

नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या विरोधात अप्रत्यक्षरीत्या बंड पुकारले आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: येथील नगरपालिका मंडळातील सत्ताधारी भाजपप्रणित गट तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या विरोधात अप्रत्यक्षरीत्या बंड पुकारले असून, त्यांची या खुर्चीवरून उचलबांगडी करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्यावर सत्ताधारी गटच नाखूश असल्याचे समजते.

(An indirect rebellion has been called against the mayor Shubhangi Wayangankar in goa)

अलीकडेच येथील गांधी चौकातील नवीन कदंब बसस्थानकाच्या शेजारी एक बेकायदा गाळा थाटण्यात आला होता. मुळात हा गाळा भाजप विरोधकांचा होता. या गाळ्यास नगराध्यक्षांचा वरदहस्त असल्याचा प्रकार समजताच पालिका मंडळातील सत्ताधारी गटात अस्वस्थता पसरली. शेवटी या गटाच्या दबावामुळे हा गाळा नंतर पालिका कर्मचाऱ्यांनी हटवला. तसेच सत्ताधारी गटाला बगल देत विरोधी गटातील काही नगरसेवकांची खुशाली राखली जात आहे. या प्रकारामुळेही सत्ताधारी गटात सध्या नाराजी असल्याचे समजते.

दरम्यान, नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर पालिका कर्मचारिवर्गही नाखूश आहे. पर्यवेक्षकाप्रमाणे नगराध्यक्ष या कर्मचारिवर्गावर नजर ठेवून असतात, शिवाय हजेरीपट्टी तपासली जाते. त्यामुळे पालिका कर्मचारी संघटनेवर कामगारांनी सध्या दबाव आणण्यास सुरवात केली आहे. नगराध्यक्षांची उचलबांगडी करावी; अन्यथा बेमुदत संपावर जाण्याच्या निर्धारापर्यंत हे कर्मचारी पोचले आहेत.

सत्ताधाऱ्यांच्या हाती आयतेच कोलीत

पालिका मंडळातील सत्ताधारी गटाच्या हाती कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांना हटवण्याच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. पावसाळी अधिवेशन संपताच नेतृत्व बदलण्याची मागणी पक्ष नेतेमंडळींकडे करण्याचा निर्णयही या गटाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

SCROLL FOR NEXT