Trivikram Pai Raiturkar Dainik Gomantak
गोवा

zambaulim shigmotsav : श्री दामबाब अन्‌ कलाकारांतला दुवा ‘हरदास’

त्रिविक्रम पै रायतूरकर यांचे हरदास भूमिकेतील सुवर्ण महोत्सवी वर्ष

मंगेश बोरकर

जांबावली शिगमोत्‍सवात श्री दामबाब व कलाकार यांच्‍यातील एक महत्त्‍वाचा दुवा म्‍हणजे हरदास हा भाविक होय. या उत्सवात आठ दिवस हरदासाची प्रमुख जबाबदारी असते.

शिगमोत्‍सवात तो कीर्तनकार नसतो किंवा पौराणिक कथा सांगणारा, सामाजिक, राजकीय घटनांचा उहापोह करून भाविकांना उपदेश करणारा उपदेशकही नसतो. तर, वेगवेगळ्या पात्रांना उदाहरणार्थ गणपती, विदूषक आदींनी श्री दामोदरासमोर प्रस्तुत करणारा एक दुवा असतो.

मडगावी स्व. पुरुषोत्तम केणी यांच्या निवासस्थानी शिगमोत्‍सव नारळाची पूजा असते. त्या दिवसापासून हरदासावरील जबाबदारी सुरू होते ती शिगमोत्‍सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे धुळपेटीनंतर संपते.

१९७३ पासून हरदासची भूमिका कोंब-मडगाव येथील एक प्रतिष्ठित नागरिक त्रिविक्रम पै रायतुरकर करीत आहेत. यंदाचे हे त्यांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष. २७ ऑगस्ट १९४३ साली जन्मलेले रायतुरकर ८० वर्षाचे असले तरी हरदासची भूमिका ते अत्‍यंत तन्मयतेने साकारतात. हरदासच्‍या भूमिकेतील ५० वर्षें पूर्ण करण्याचे त्‍यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

पूर्वी हरदासाची भूमिका कै. बाबुराव पै पाणंदीकर व नंतर कै. शांतारामबाब पाणंदीकर हे बजावत होते. त्रिविक्रम पै रायतुरकरांनी ही जबाबदारी कै. शांताराम पाणंदीकर यांच्याकडून स्वीकारली.

हरदासाबरोबर पखवाजवादक त्याला संगत करत असतो. गेली २९ वर्षे दामोदर पै पाणंदीकर समर्थपणे पखवाज साथ देत असल्याचे रायतुरकर म्हणाले. नाटकापूर्वी गणपती आराधनेनंतर श्री दामबाबची मूर्ती प्राकारात आणून ठेवली जाते.

महत्त्‍वपूर्ण जबाबदारी

मडगावात ज्या दिवशी केणी यांच्या निवासस्थानी नारळ ठेवतात, तेव्हा हरदास या नात्याने रायतुरकर आरती म्हणतात. नंतर गाऱ्हाणेही ते घालतात. दुसऱ्या दिवशी नारळ जेव्हा जांबावलीला नेला जातो, त्या मिरवणुकीचे नेतृत्वही हरदास करतो.

जांबावलीला नारळाची स्थापना केल्यावर गणपतीच्या खोलीत सांगणे वगैरे करून तो नारळ ‘राम राघव गोविंदा, या जयघोषात घेऊन श्री दामबाबच्या मंदिरात जाणे व रंगमंचापर्यंत येणे हे सर्व कार्य हरदासाच्या नेतृत्वाखाली होते. नाटक सुरू होण्यापूर्वी गणपतीची भूमिका साकारलेल्या व्यक्तीचे पूजन करणे हेही काम हरदासच करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT