Bicholim News Dainik Gomantak
गोवा

अन्.. विठूरायाच्या दर्शनाचे स्वप्न राहिले अपुरे..! डिचोलीच्या बाजारात कोसळून वृद्धा मृत्यूमुखी

Bicholim News: पंढरपूरसाठी रवाना होणाऱ्या डिचोलीतील एका वृद्ध महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, ता. २४ (प्रतिनिधी) : पंढरपूर च्या 'विठूराया'च्या दर्शनाची तीला आस लागली होती. पंढरपुरला जाण्यासाठी तिची तयारी चालू असतानाच, क्रूर काळाने तिच्यावर झडप घातली आणि 'विठूरायाच्या दर्शनाचे तिचे स्वप्न अपुरेच राहिले.

ही कहाणी आहे, हळदणवाडी-मये येथील सुधा चंद्रकांत चोडणकर (वय-६५) या वृद्ध महिलेची. आज (गुरुवारी दि. २४ ऑक्टोबर) रोजी सकाळी त्या डिचोलीच्या बाजारात कोसळल्या आणि त्यातच त्यांना दुर्दैवी मरण आले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मृत्यू आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मयत सुधा चोडणकर या वृद्धेच्या पार्थिवावर आज सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सुधा चोडणकर ही महिला अन्य भक्तांसमवेत 'विठू माऊली'च्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणार होती.

गुरुवारी रात्रीच त्या सर्वांसोबत पंढरपूरला जाणार होत्या. प्रवासात लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्या गुरुवारी सकाळी डिचोलीच्या बाजारात आल्या होत्या, मात्र दुर्दैवाने पंढरपूरला जाण्याआधीच त्यांना मृत्यूने गाठले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT