Suicide Dainik Gomantak
गोवा

Suicide News : म्हापशातील ‘त्या’ युवकाचा व्हिसेरा पोलिसांकडे राखीव

Suicide News : पोलिसांकडून मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला व शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Suicide News : म्हापसा, खोर्ली-म्हापसा येथील आत्महत्या केलेल्या १८ वर्षीय युवकाचा शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला असून, म्हापसा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

या व्हिसेराचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे अचूक कारण समजू शकेल. स्वयम नाईक असे मृत युवकाचे नाव आहे. दरम्यान, स्वयमच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. पोलिसांकडून मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला व शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वयमने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. ही घटना गुरुवारी (ता.२३) दुपारी ३.३० वा.च्या सुमारास उघडकीस आली होती. हा प्रकार पाहून घरच्यांनी त्याला तातडीने इस्पितळात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.

स्वयमने सुसाइट नोट लिहून ठेवले असून, आपल्या मृत्यूला घरचे किंवा कुणाला कारणीभूत धरू नये, असे त्यात म्हटल्याचे समजते.

या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. स्वयम हा महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. याशिवाय तो जेईईची तयारी करत होता. कदाचित अभ्यासाच्या तणावाखाली असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT