Goa Dairy Milk Price Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy Milk Price: राज्यात दूध दरवाढ अटळ, गोवा डेअरीही दरवाढ करण्याच्या विचाराधीन

Goa Dairy milk price hike: महागाई गगनाला भिडत असतानाच आता दूध उत्पादनातील अग्रगण्य असलेल्या ‘अमूल’ डेअरीने त्यांच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केल्यामुळे इतर डेअऱ्यांनीही दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: महागाई गगनाला भिडत असतानाच आता दूध उत्पादनातील अग्रगण्य असलेल्या ‘अमूल’ डेअरीने त्यांच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केल्यामुळे इतर डेअऱ्यांनीही दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील महत्त्वाची गोवा डेअरीही दूध दरात वाढ करण्याच्या विचारात असून ग्राहकांना परवडेल अशी ही दरवाढ करण्यात येईल, असे गोवा डेअरीच्या खास सूत्रांनी सांगितले.

अमूलने दूध दरवाढ केल्यानंतर आता सर्वच डेअऱ्या दरवाढ करण्याच्या विचारात असल्याने महागाईत आणखी तेल ओतण्यासारखा प्रकार घडणार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

यांवरून ५७ रुपये, अमूल गोल्ड ६८ वरून ७० रुपये, अमूल गाईचे दूध ६० वरून ६२ रुपये तर अमूल चहा स्पेशल दूध ६४ वरून ६६ रुपये केले आहे.

गोवा डेअरीचे दूध दर इतर डेअऱ्यांपेक्षा तसे कमीच आहेत. शिवाय गोवा डेअरीला राज्यात सर्वाधिक पसंतीही आहे. शिवाय शुद्ध आणि ताज्या दुधाबाबत गोवा डेअरी प्रसिद्ध आहे. त्यामुळे लिटरमागे २ की ४ रुपये दरवाढ करावी, याबाबत व्यवस्थापनाकडून विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, गोवा डेअरीने दूध उत्पादकांना भरीव वाढ दिल्यामुळे ते सध्या खूश आहेत. मात्र हा आर्थिक बोजा भरून काढण्याच्या योजना सध्या गोवा डेअरीकडून राबविल्या जात असल्याचे सांगण्यात आले.

गोवा डेअरीचे सध्याचे दूध दर असे...

१. पूर्ण मलई दूध (केशरी पाकीट): ७० रु. प्रतिलिटर.

२. शक्ती (प्रमाणित) दूध : २९ रु. प्रति ५०० मि.ली.

३. गाईचे दूध (लाल पाकीट) : २७ रु. प्रति ५०० मि.ली.

४. कोल्ड गोल्ड (टोन्ड) दूध (निळे पाकीट) : ५१ रु. प्रतिलिटर/ रु. २५ प्रति ४७५ मि.ली.

५. दही : अंदाजे ६८ रु. प्रतिकिलो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

Viral Video: ना धड इंग्रजी बोलता येईना, ना वाचता येईना! पाकिस्तानी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

SCROLL FOR NEXT