Amritsar to Margao special train Dainik Gomantak
गोवा

Amritsar Margao Train: प्रवाशांसाठी खुशखबर! गोव्यासाठी धावणार खास ट्रेन; मडगाव-अमृतसर आरक्षित एक्स्प्रेस रेल्वे सुरू

Amritsar to Margao special train: ०४६९४ क्रमांकाची अमृतसर- मडगाव-अमृतसर ही विशेष आरक्षित एक्सप्रेस रेल्वे २७ डिसेंबर २०२५ व १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ५.१० वा. अमृतसर येथून सुटेल.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: नाताळ व नववर्षाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन उत्तर रेल्वेच्या सहकार्याने अमृतसर-मडगाव-अमृतसर मार्गावर खास आरक्षित एक्सप्रेस रेल्वे चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

०४६९४ क्रमांकाची अमृतसर- मडगाव-अमृतसर ही विशेष आरक्षित एक्सप्रेस रेल्वे २७ डिसेंबर २०२५ व १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ५.१० वा. अमृतसर येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वा. मडगाव स्थानकावर पोहोचेल.

०४६९३ क्रमांकाची मडगाव-अमृतसर ही विशेष आरक्षित एक्सप्रेस २४ व २९ डिसेंबर २०२५ व ३ जाने. २०२६ रोजी सकाळी ८. वा. मडगाव रेल्वे स्थानकावरून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वा. अमृतसर येथे पोहोचेल.

ही विशेष एक्सप्रेस रेल्वे बियास, जालंधर सिटी, लुधियाना जं., अंबाला कँट, पानिपत, दिल्ली सफदरजंग, मथुरा जं., गंगापूर सिटी, सवाई माधेपूर जं., कोटा जं., रतलाम जं., वडोदरा जं., सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी व करमळी या रेल्वे स्थानकांवर थांबेल. या रेल्वेला एकूण २१ एलएचबी डबे असून एसी थ्री-टायर २ डबे, एसी थ्री-टायर इकॉनॉमी २ डबे, स्लीपर कोच ८ डबे, सामान्य (जनरल) ७, डबे व जनरेटर कार २ डबे असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

Benaulim Beach: एव्हरी डे इज ए गुड डे! फिशरमन पेलेचा बम्पर कॅच; विद्यार्थ्यांनीही घेतले मासेमारीचे धडे Watch Video

SCROLL FOR NEXT