Gas Connection Dainik Gomantak
गोवा

Gas Connection: 'रक्कम भरली, मीटरही जोडले', पण फोंड्यात गॅस वाहिन्यांची जोडणी कधी पूर्ण होणार?

Gas Connection: फोंड्यात 2019 मध्ये सुरू झालेल्या कामाला चार वर्षे झाली तरी अजून अनेक ग्राहक प्रतीक्षेत आहेत.

दैनिक गोमन्तक

Ponda Gas Connection: फोंड्यातील गॅस वाहिन्यांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. 2019 मध्ये सुरू झालेल्या कामाला चार वर्षे झाली तरी अजून अनेक ग्राहक प्रतीक्षेत आहेत.'' गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड '' या संस्थेने गॅस वहिनी जोडणीसाठी फोंड्यातील ग्राहकांकडून आगाऊ रक्कम म्हणून पाचशे ते दोन हजार रुपये घेतले होते. त्यावेळी सहा महिन्यात ग्राहकांना स्वयंपाकाला लागणारा गॅस मिळेल, असे आश्वासनही देऊन काही घरात कंपनीने मीटर्सही बसवले होते. मात्र,अपेक्षांची पूर्तता कधी होणार या प्रतीक्षेत ग्राहक आहेत.

काही दिवसांपूर्वी दै. ‘गोमन्तक’ने आवाज उठवल्यावर या कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग येऊन त्यांनी गॅसकरिता आगाऊ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांची भेट घेतली होती. ज्या भागात गॅसचा पुरवठा करण्याकरता आवश्यक वाहिनीची जोडणी केली आहे त्या भागातील ग्राहकांना पुरवठ्यासाठी उर्वरित रक्कम भरण्याची सूचना करण्यात आली होती. आणि ज्यांनी पूर्ण पैसे भरले आहे त्याना गॅस पुरवठा करण्यात आला होता.

गॅसचा थेट पुरवठा झाल्यास सिलिंडर्स बुक करणे तसेच सिलिंडर्स कधी येतात याची वाट बघत राहणे यासारख्या वेळकाढू बाबीतून मुक्तता होईल या अपेक्षेने फोंड्यातील अनेक ग्राहकांनी या गॅस वाहिनी चे बुकिंग केले होते. त्याचप्रमाणे या थेट गॅस पुरवठ्याचे बिलही सिलेंडरच्या गॅस पेक्षा कमी येईल, असेही सांगण्यात आले होते. फोंड्याचे आमदार तथा कृषी मंत्री रवी नाईक यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे चार वर्षांनी का होईना प्रश्‍न सुटेल,अशी आशा फोंडावासीयांना आहे.

मीटर्स बनले ‘शोपीस’ !

जिथे वाहिनीची जोडणी झालेली नाही, तेथील ग्राहकांना दोन महिन्यात या जोडण्या पूर्ण होतील, असे सांगितले होते. पण सहा महिने उलटूनही जोडण्यांचे काम सुरू झालेले नाही. याबाबत विचारले असता कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ठोस असे उत्तर मिळाले नाही.

कामाला सुरुवातच झाली नसल्याने कधी संपणार, हा प्रश्नच येत नाही. यामुळे आगाऊ रक्कम भरलेल्यांचे काय, हा प्रश्न कायम आहे.त्यामुळे सध्या घरात बसवलेले मीटर्स फक्त ''शोपीस '' बनले आहेत.

येत्या दोन दिवसांत बैठक- रवी नाईक

या गॅस पुरवठ्याच्या बाबतीत आपल्याकडेही अनेक तक्रारीआल्या असून येत्या एक दोन दिवसात आपण या गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार असून ज्यांनी कुणी आगाऊ रक्कम भरलेली आहे, त्यांना लवकरात लवकर गॅस कनेक्शन मिळेल हे पाहणार आहे. सर्व फोंडावासीयांना या गॅस पुरवठ्याचा लाभ मिळेल, यावर आपला कटाक्ष असणार आहे,असे कृषीमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

महादेव खानोलकर, माजी उपनगराध्यक्ष, फोंडा-

गेली चार वर्षे झाली या गॅस कंपनीचे अधिकारी पुरवठा आज होणार उद्या होणार, अशी थातूरमातूर आश्वासने देत आहेत. काही लोकांना ही गॅस जोडणी देण्यात आली आहे. तर काही ग्राहक अजूनही वंचित आहेत. गॅस जोडणी सुरू करायची नसेल तर बसवलेले मीटर्स कंपनीने घेऊन जावेत. आणखी आमच्या सहनशक्तीची परीक्षा न बघता आगाऊ भरलेली रक्कम परत द्यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT