Pramod Sawant
Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: टोपी, कार्ड, कर्नाटक आणि 'भिवपाची गरज ना', अमित शहांच्या समोर काय बोलले प्रमोद सावंत

Pramod Yadav

Amit Shah In Goa: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमोद सावंत यांनी आगामी काळात दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत, अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री सावंत

गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकेल यात मला शंका वाटत नाही. 2014 मध्ये दोन्हीकडील आपले उमेदवार जिंकले होते पण, 2019 मध्ये दक्षिण गोव्यात आपल्याला अपयश आले. दरम्यान, 2024 मध्ये आपण दक्षिणेत जिंकणारच असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. सावंत यांनी यावेळी शहांना आश्वसत करताना दक्षिणच्या जागेबाबत 'भिवपाची गरज ना' असा शब्दात विश्वास व्यक्त दिला.

कर्नाटकमध्ये देखील जिंकणार

एवढेच नव्हे तर आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत देखील भाजप मोठ्या संख्येने विजयी होईल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

केजरीवाल

मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. निवडणुक आली कोण टोपीवाले कोणी कार्डवाले येतात आणि त्यानंतर ते दिसतच नाहीत अशा शब्दात सावंत यांनी दोघांवर टीका केली.

एवढेच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी टोपीवाल्याचा फोटो दिसतो त्यांना पोलिसांनी समन्स देखील पाठवला असल्याचे सावंत आपल्या भाषणात म्हणाले.

दरम्यान, शहांना राज्यातील दोन्ही लोकसभा जागांबाबत विश्वास दिला. व डबल इंजिन सरकारने राज्यात केलेल्या विकास कामांची माहिती दिली.

तसेच, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील अनुसूचित जमाती (एसटी) यांना राजकीय आरक्षण देऊ. असे आश्वासन देखील सावंत यांनी यावेळी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

SCROLL FOR NEXT