Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेसची बैठक झाली; पण मला निमंत्रण नाही! गिरीश यांच्याशी मतभेत नाहीत

Amit Patkar Goa Congress: अखिल भारतीय काँग्रेसची आज बैठक झाल्याचे समजते, परंतु मला त्याबाबत कोणतीही सूचना मिळाली नाही.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: अखिल भारतीय काँग्रेसची आज बैठक झाल्याचे समजते, परंतु मला त्याबाबत कोणतीही सूचना मिळाली नाही. त्यामुळे आज कोणत्या काँग्रेसची बैठक आहे, हे तुम्ही शोधायला हवे. आपणास त्या बैठकीचे निमंत्रण नाही, याविषयी प्रदेशाध्यक्षांनाच विचारायला हवे, असे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

कारापूरच्या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या पाटकर यांनी प्रदेशाध्यक्षपदापासून दूर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना काही प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले, गिरीश चोडणकर व माझ्यात कोणताही संघर्ष असल्याचे मला दिसत नाही. यापूर्वी गिरीश यांच्यावर इतर राज्यांमधील जबाबदाऱ्या असल्याने आम्ही एकत्र दिसत नव्हतो. भविष्यात एकत्र दिसण्यावर नंतर ठरवले जाईल. परंतु माझ्यात व गिरीश यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असा पुनरुच्चार काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत पाटकर यांनी सांगितले की, आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि विजय हे देखील केवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दलच बोलत होते. आपणास काही दिवसांपूर्वी आणखी एक काँग्रेस आहे काय म्हणून विचारत होते.

काँग्रेस (Congress) पक्षातील अमित पाटकरांचे पद काय, यावर ते म्हणाले, हा प्रश्न पक्षाच्या गोवा प्रभारींनाच विचारला पाहिजे. आपण काँग्रेसचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. गेली चार वर्षे आपण पक्षाची बांधणी केली. सध्या माझ्यावर कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. चोडणकर यांच्या अध्यक्षपदाच्या पदग्रहण समारंभाच्या वेळी गिरीश आणि ठाकरे यांनी मला बोलावले होते, परंतु मी त्यावेळी दूर असल्याने उपस्थित राहू शकणार नाही, असे त्यांना कळवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

SCROLL FOR NEXT