Goa Congress President Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition : आमदार अपात्रताप्रकरणी पाटकर उच्च न्यायालयात

आमदार अपात्रता याचिका पक्षाचे पदाधिकारी किंवा आमदार सादर करू शकतात

दैनिक गोमन्तक डिजिटल

आमदार अपात्रताप्रकरणीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तीन महिन्यांत पूर्ण करण्याची गरज असताना ती करण्यात आली नाही, त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सभापतींविरुद्ध याचिका सादर केली आहे.

पाटकर यांनी सभापतींसमोर 9 डिसेंबर 2022 रोजी आठ आमदारांविरुद्ध आमदार अपात्रता याचिका सादर केली आहे. या याचिकेवर अजूनही सुनावणी घेण्यात आलेली नाही ती घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती पाटकर यांनी याचिकेत केली आहे.

दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचीही उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावरील सुनावणी अर्धवट झाली असून त्यावर येत्या गुरुवारी पुढे सुनावणी होणार आहे.

आमदार अपात्रता याचिका पक्षाचे पदाधिकारी किंवा आमदार सादर करू शकतात. अमित पाटकर यांच्या याचिकेवर सुनावणी सभापतींसमोर सुरू असली तरी ती पूर्ण झालेली नाही. ती सुनावणी घेण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती पाटकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT