Amit Patkar | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa LDC Recruitment Scam: एलडीसी नोकरी भरती 'महा घोटाळा', भ्रष्टाचारात अनेकजणांचे हात बरबटले; अमित पाटकरांचा घणाघात

Manish Jadhav

कोणाला किती एलडीसी पदांचे वाटप झाले? कोणाच्या विनंत्या नाकारल्या? सात पदांच्या मागणीचे गूढ काय? मिशन टोटल कमिशनचे भागीदार कोण? या सर्व प्रश्नांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. दक्षिण गोवा जिल्‍हाधिक़ारी कार्यालयातील कारकून भरती प्रकरणात भ्रष्‍टाचाराचा आरोप झालेला असतानाच काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष पाटकर यांनी या घोटाळ्‍याची व्‍याप्‍ती बरीच मोठी आणि त्‍यात अनेकजण गुंतले आहेत, असा आरोप केला.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका राजकारण्याने सात एलडीसी पदांची मागणी केली होती. परंतु महसूलमंत्री आतानासियो उर्फ बाबूश मोन्सेरात यांनी त्या राजकारण्याच्या मागणीला नकार दिला. आणखी एका सूत्रानुसार, भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या शिफारसीनुसार अनेक जणांना निवडण्यात आले आहे. या सगळ्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

गोव्यातील सुशिक्षित तरुणांच्या भवितव्याशी काँग्रेस पक्ष कोणालाही खेळू देणार नाही. भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्ट कार्यपद्धतीचा अवलंब करून भाजपने गोमंतकीयांच्या आशा-आकांक्षा उद्ध्वस्त केल्या आहेत. महसूलमंत्री मोन्सेरात हे नोकऱ्यांच्या विक्रीबाबत पुरावे मागत आहेत, हे धक्कादायक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मिशन टोटल कमिशनच्या पावत्या देण्याची नवीन योजना सुरू केली आहे का, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे पाटकर म्हणाले.

या बोटीवरील कामगारांना तडीवर आल्‍यावर कुठेही राहण्‍याची सोय उपलब्‍ध नाही. त्‍यामुळे दहा वर्षांपूर्वी वेळ्‍ळी गावात या कामगारांसाठी एक रिक्रिएशन केंद्र उभारावे, असा प्रस्‍ताव आला होता. मात्र, एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगार ठेवण्‍यास स्‍थानिकांचा विराेध होता. त्‍यामुळे हा प्रस्‍ताव पुढे मार्गी लागू शकला नाही, अशी माहिती मच्‍छीमार फेडरेशनचे माजी अध्‍यक्ष तथा सध्‍याचे संचालक विनय तारी यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भ्रष्ट भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. संधीसाधूंना राजकीय लाभ उठवू देऊ नका आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी खेळू नका. स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत सर्व भरती प्रक्रिया करणे, हा एकच मार्ग आहे. एलडीसी पदे रद्द करा, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस

आम्ही एकंदरित सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. गोव्याच्या आणि युवकांच्या भवितव्याशी आम्ही कोणत्याही राजकारण्याला खेळू देणार नाही. आम्ही वस्तुस्थिती आणि सत्याच्या बाजूने उभे राहू. लक्ष विचलित करण्यासाठी एकमेकांच्या संगनमताने स्वार्थी राजकारण्यांनी मांडलेल्या कपट-छळाला बळी पडणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भूतानी इन्फ्रा! लोकांच्या माथी खापर फोडू नका; संपादकीय

Fit Goa Police Mission: पोलिसांना Fit ठेवण्यासाठी गोव्यात Fit Goa Police मिशन!!

Whale Fishing: सोशल इंजिनिअरिंगद्वारे देवमाशाची शिकार! सायबर फ्रॉडचा आधुनिक फंडा

Goa Today's News Live: गोव्यात पावसाची विश्रांती; ‘पारा’ वाढू लागला

Margao: मी शपथ घेतो की, 'पंधरा दिवसांत मडगाव चकाचक करणार'; पालिकेचे स्वच्छता ही सेवा अभियान

SCROLL FOR NEXT