Vishwajit Rane and Amit Patkar News Dainik Gomantak
गोवा

विश्वजित राणे यांना चिंतनाची गरज : अमित पाटकर

सरकारने जुने गोवेत लक्ष केंद्रित करावे : पाटकर

दैनिक गोमन्तक

पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्यातील वाकयुद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. राणे यांनी त्यांच्याबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेला पाटकर यांनी आज प्रत्युत्तर दिले. मंत्री असूनही ज्या प्रकारच्या भाषेचा उपयोग राणे करतात ते अलोकतांत्रिक आणि अनैतिक आहे. त्यांच्यासारखे खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका आपण करणार नाही, असे पाटकर यांनी स्पष्ट केले. (Vishwajit Rane and Amit Patkar News)

राणे यांच्या वर्तनातून त्यांची चिडचिड होत असल्याचे दिसून येते, त्यासाठी त्यांनी चिंतन करायला जाण्याची आवश्‍यकता आहे, असा सल्ला पाटकर यांनी दिला.

जुने गोवे येथे आज ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सांताक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस, काँग्रेस पक्षाचे प्रवक्‍ते कॅ. विरियातो फर्नांडिस उपस्थित होते. जुने गोवे येथील वारसा स्थळात विवादीत बांधकामांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्यांची काँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

राणे यांना गोव्यातील वारसा वाचवायचा असेल, तर त्यांनी कळंगुटऐवजी येथे जुने गोवेत लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कारण येथे वारसा स्थळात बेकायदेशीर बांधकाम झाले आहे. बऱ्याच काळापासून येथे लोक त्या बांधकामाला विरोध करत आहेत. राणे यांनी येथे भेट देऊन त्या बांधकामावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान पाटकर यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, बाह्यरेखा विकास आराखडे (ओडीपी) चुकीचे असल्याचे विधान राणे करत आहेत. आराखडे ज्या सरकारने केले, त्या सरकारात राणे मंत्री होते, तर आता त्यांच्या म्हणण्यानुसार आराखड्यांमध्ये चूक आहे. म्हणजे सरकारकडून चूक झाली आहे असा याचा अर्थ होतो.

दरम्यान, जुने गोवे येथे वारसा स्थळात बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात आंदोलन करत असलेल्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट दिली, परंतु यावेळी स्थानिक आमदार राजेश फळदेसाई अनुपस्थित होते. यासंदर्भात प्रश्‍न विचारला असता पाटकर यांनी स्पष्टीकरण दिले की, फळदेसाई यांना याबद्दल कळवण्यात आले होते. मात्र, काही कामानिमित्त ते दक्षिण गोव्यात असल्याने पोहोचू शकले नाहीत, असे सांगितले.

‘राणेंकडून कुडचडकरांचा अपमान’

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी मी आमदार होण्यात अयशस्वी झालो, असे विधान करून ९ हजार 301 कुडचडकरांचा अपमान केला आहे. त्‍यांच्यावर कोणी काही बोलल्यास ते वैयक्तिक पातळीवर टीका करतात, परंतु मी त्या स्तराला जाणार नाही. त्यांना माझी गाडी हवी असेल, तर ते काही दिवसांसाठी घेऊन जाऊ शकतात, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला.

‘पाटकर यांनी संयम राखावा’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी संयम राखून बाह्य विकास आराखड्याच्या (ओडीपी) चौकशी अहवालाची प्रतीक्षा करावी. राजकारणातील नवशिक्याकडून मला सल्ल्याची आवश्‍यकता नाही. मी काय करत आहे याची जाणीव मला असून ते पारदर्शकपणे केले जात आहे, असा पलटवार आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Viral Video: हत्तीने कारला खेळण्यासारखं हवेत उडवलं, ड्रायव्हर थोडक्यात बचावला; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन अटकेत, रचला होता मोठा कट

Viral Post: "शेर कभी शिकार करना नहीं भूलता!" रोहितच्या वादळी खेळीवर युवीची प्रतिक्रिया; पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT