पणजी : पंचायत निवडणूक पुढे ढकलण्याच्या अपयशी कारभारास सरकारच जबाबदार आहे. निवडणुकांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्यातून सरकारचे पितळ उघडे पडले आहे. निवडणूक पुढे ढकलण्यामागे सरकारचा स्वार्थी हेतू होता, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.(Amit Patkar News)
पणजी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा काँग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, कॅ. विरियातो फर्नांडिस, माजी सरपंच जोसेफ वाझ, ॲड. श्रीनिवास खलप व इतर मान्यवर उपस्थित होते.
पंचायतराज कायद्याचे उल्लंघन
यावेळी अमित पाटकर म्हणाले की, भाजप केवळ दलितांचे न्याय हक्क दाबत आहे. २० टक्के ओबीसी समाजावर आम्ही अन्याय करू शकत नाही. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक लालसेपोटी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी केला. पंचायत मंत्री स्वतःहून पंचायतराज कायद्याचे उल्लंघन करत आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघातील पंचायत मंडळ पाडले आहे. (Goa Government News)
शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यात आल्यानंतर गोवा सरकारने त्यांच्या सोयीसाठी करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करू नये, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. सध्या देशात आणि राज्यात जे घडते आहे, हे लोकशाहीविरोधी आहे. त्यात आता बंडखोर आमदार, जर गोव्यात येत असतील तर गोवा सरकारने यात हस्तक्षेप करू नये, अशी मागणी पाटकर यांनी केली.
सरकार लोकांच्या पाठीशी नसून, निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल ते सतत भूमिका बदलतात, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. विद्यमान सरकार सध्या बनाना रिपब्लिक झाले आहे. येथे कुठलाही कायदा किंवा लोकांच्या भावनांचा सन्मान केला जात नाही. प्रत्येक मुद्द्यावर नागरिकांना न्यायालयात जावे लागत असेल, तर सरकारची गरजच काय? पंचायतमंत्र्यांनी त्यांना हवे असलेले प्रशासक नेमले आहेत, असे पाटकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.