Amit Patkar 
गोवा

Amit Patkar: 'आपल्याच पक्षातील लोक प्रसारमाध्यमांकडे चुकीची माहिती पोहोचवतायेत'; अमित पाटकर असं का म्हणाले?

Goa Congress: अमित पाटकर यांनी रविवारी (9 मार्च) 'गोमन्तक'शी बोलताना गोवा प्रभारी ठाकरे आणि पाटकर यांच्यात दरी निर्माण झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते.

Manish Jadhav

Amit Patkar Claims Congress Members Spreading False Information

पणजी: तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासोबत विविध मतदारसंघातील पक्षाच्या गटसमित्यांच्या बैठका घेऊन पक्ष बांधणीचे काम पुढे नेणाऱ्या अमित पाटकरांची खुर्ची आणखी मजबूत होणार आहे. ठाकरे यांनी पाटकरांच्या कामाचे कौतुकच केले नाहीतर अंतर्गत कलहाची देखील दखल घेतली.

आपल्याच पक्षातील लोक चुकीची माहिती पोहोचवतायेत

अमित पाटकर यांनी रविवारी (9 मार्च) 'गोमन्तक'शी बोलताना गोवा प्रभारी ठाकरे आणि पाटकर यांच्यात दरी निर्माण झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्याशिवाय, प्रसारमाध्यमांकडे आपल्याच पक्षातील लोक चुकीची माहिती पोहोचवत असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून पक्षात काही अलबेल नाही असं सांगण्यात आलं. राज्य नेतृत्वात छुपा संघर्ष आसल्याचं देखील सांगण्यात आलं. मात्र आमचं सगळं काही ठीक सुरु आहे, असं म्हणत पाटकर यांनी या अफवांना पूर्णविराम दिला.

ठाकरे यांचा गोवा दौरा

ठाकरे गोव्यात (Goa) असताना हा सर्व प्रकार घडल्याने त्यांना या वृत्ताची आणि घडत असलेल्या घटनांची दखल घ्यावी लागली. ठाकरे यांनी आपल्या दौऱ्यात गोव्यातील चार मतदारसंपातील गटसमित्यांच्या बैठका घेतल्या आणि पक्ष बांधणीविषयी, त्याचबरोबर गटसमितीच्या कार्याची माहिती जाणून घेतली. याशिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शनही केले. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व (40) विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम सुरु असल्याचे देखील ते यावेळी सांगायला विसरले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT