Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: भाजप सरकारमुळे राज्यातील खाणी बंद, आता पर्यटनही उद्‍ध्वस्त करतेय; अमित पाटकरांचा हल्लाबोल

Amit Patkar Criticized Goa Government: भाजप सरकारने राज्यातील खाण व्यवसाय बंद पाडला. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आता पर्यटन क्षेत्र उद्ध्वस्त करत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: भाजप सरकारने राज्यातील खाण व्यवसाय बंद पाडला. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आता पर्यटन क्षेत्र उद्ध्वस्त करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी बाबी बागकर, राजन कोरगावकर, वीरेंद्र शिरोडकर, चंदन मांद्रेकर, लॉरेंस सिल्वेरा आणि विवेक डिसिल्वा उपस्थित होते.

पाटकर म्हणाले, सर्व मंत्री, आमदार, नोकरशहा आणि भाजपचे पदाधिकारी सर्वच भ्रष्ट कारभाराने पैसा कमावण्यात व्यस्त असल्याने प्रशासन ढासळले आहे. आता परप्रांतीय गोमंतकीयांवर हल्ले करत असल्याने कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. दिवसाढवळ्या मुलींची छेडछाड होते आणि पोलिस बघ्याची भूमिका घेतात.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात गुन्ह्यांचा शोध घेण्याचे प्रमाण ९५ टक्के असल्याचा दावा केला आहे. तसे असेल तर सिद्धी नाईक हिच्या गूढ मृत्यूचे कारण अद्याप का सुटले नाही? त्‍यांनी स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन आणि समर्थन देण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी भाजप सरकारची निंदा केली.

ते म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याबद्दल, गोव्यातील जमिनीचे सर्रासपणे होत असलेले अवैध रुपांतरण आणि गोव्याची ओळख नष्ट केल्याबद्दल भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे. राज्यातील दुसरा विरोधी पक्ष असलेल्या ‘आप’चे प्रदेश कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनीही सरकारवर टीका केली. ते म्हणाले, अलीकडेच रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले की राज्यातील ८० टक्के अपघात मद्य पिऊन गाडी चालवल्यामुळे होतात. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अपघात रोखण्यासाठी पंजाब सरकारकडून धडा घ्यावा.

तर राजीनामा द्या!

आप नेत्या सिसिल रॉड्रिग्स यांनी खड्डेमय रस्त्यामुळे, गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या आईचे उदाहरण दिले. ‘गोव्यातील रस्त्यांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. भाजप सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे.

मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक बांधकाम खाते हाताळता येत नसल्यास त्यांनी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री गोमंतकीयांचा जीव वाचवण्याबाबत गंभीर असतील, तर त्यांनी राज्यातील अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी, नागरिकांच्या मदतीने रस्ता सुरक्षा समित्या सुरू कराव्यात,असेही रॉड्रिग्स यांनी सांगितले.

स्थानिकावरील हल्ल्याचा निषेध

युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा यांनी कळंगुट येथे स्थानिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. पंचायत सदस्यांपासून उत्तर गोव्याचा खासदार हे सर्व भाजपचेच आहेत. भाजपच गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असल्याचे यातून स्पष्ट होते असा दावा त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT