Amit Patkar: ..हा तर गोव्यातील तरुणांच्या भवितव्याशी खेळ! राज्य सरकारच्या भरती प्रक्रियेवर पाटकरांची सडकून टीका

Goa Employment: भाजप सरकार जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य, पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील भरती घोटाळ्यांपासून भाजप सरकारने धडा घेतलेला नाही. भाजप सरकारने कर्मचारी निवड आयोग रद्द करून विभागीय भरती लागू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Amit Patkar's criticism About Goa BJP government's Recruitment Process

भाजप सरकार जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य, पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील भरती घोटाळ्यांपासून भाजप सरकारने धडा घेतलेला नाही. भाजप सरकारने कर्मचारी निवड आयोग रद्द करून विभागीय भरती लागू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे तरुणांना गुणवत्तेवरच नोकऱ्या मिळायला हव्यात, आयोग रद्द करण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पाटकर यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यातील तरुणांनी नोकरी विक्रीला बळी पडू नये, काँग्रेस पक्षाने भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्यावर सरकारला विविध खात्यातील भरती प्रक्रिया रद्द करावी लागली होती. भ्रष्ट नोकरभरतीच्या पूर्वीच्या घटना लक्षात ठेवाव्यात असे युवकांना आपण आवाहन करतो. भाजप दलालांच्या फसव्या आश्वासनाच्या मोहात पडून आपले पैसे घालवू नका, असेही त्यांनी सूचित केले आहे.

‘तरुणांच्या भवितव्याशी खेळ’

भाजप सरकार गोमंतकीय सुशिक्षीत तरुणांच्या भवितव्याशी खेळत असल्याचे परत एकदा उघड झाले आहे. थेट नोकरभरतीकडे वळणाऱ्या भाजप सरकारचा काँग्रेस पक्ष निषेध करीत आहे. गोमंतकीय युवकांना पैसे भरून नव्हे तर गुणवत्तेच्या आधारावर सरकारी नोकरी देणे सरकारची जबाबदारी असल्याचेही पाटकर यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com