Gautam Adani Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Goa Political News: गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधामुळे वीज निर्मितीवर विपरित परिणाम झाल्याने त्याचा बोजा सामान्य माणसाच्या खांद्यावर पडल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. काँग्रेसशासित राज्ये आणि त्यांच्या सहयोगी राज्य सरकारांनीच अदानी समूहाकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक घेतल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधामुळे वीज निर्मितीवर विपरित परिणाम झाल्याने त्याचा बोजा सामान्य माणसाच्या खांद्यावर पडल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. काँग्रेस भवनात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, गौतम अदानीविरुद्ध काँग्रेसने सतत आवाज उठविला आहे. अमेरिकेतील एसईसी या तपास यंत्रणेने अदानीविरुद्ध लाच दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अमेरिकेतील एसईसीचा अहवाल आला असून गौतम अदानी व त्यांच्या असोसिएट्सने सुमारे दोन हजार कोटींची लाच दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

छत्तीसगढ, ओरिसा, तामिळनाडू आणि जम्मू काश्मीर या राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांना सोळा हजार कोटींचे सौर ऊर्जेचे कंत्राट देऊन कंत्राट घेतले होते. हरियाणा आणि महाराष्ट्रात सौर ऊर्जेविषयी कंत्राटही त्यांनाच दिले आहे. काँग्रेस सतत याविरुद्ध आवाज उठविला आहे. हिंडनबर्ग अहवालात जे सांगितले होते, ते एसईसीने उघड केले आहे, असे पाटकर म्हणाले.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी देशभर अदानी यांचे विमान घेऊन फिरत होते. राज्यात मनोहर पर्रीकर यांचे सरकार आले, तेव्हा त्यांनी केंद्रात भाजप सरकार येताच कोळशावरील हरित कर पाच टकक्यांवरून दोन टक्के केला, त्यानंतर त्याचा कोणाला फायदा झाला हे आम्ही सतत सांगत आलो होतो. यामुळे कररूपाने दहा हजार कोटींचे नुकसान झाले आहे, असेही पाटकर म्हणाले.

काँग्रेसचा खोट्या आरोपांवर आधारित प्रचार; वेर्णेकर

अदानी समूहावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी त्या कंपनीची आहे. मात्र, काँग्रेसने खोट्या आरोपांवर आधारित प्रचार सुरू केला आहे. काँग्रेसशासित राज्ये आणि त्यांच्या सहयोगी राज्य सरकारांनीच अदानी समूहाकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक घेतल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी केला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी अमेरिकेत अदानी समूहावरील आरोपांवरून पत्रकार परिषद घेतली. पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप करताना हा विषय उचलून धरला.

त्याला प्रत्युत्तर देताना वेर्णेकर यांनी या आरोपांना तीव्र प्रत्युत्तर देत काँग्रेसवर खोटे प्रचार करण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींविषयीची नकारात्मक वृत्ती ही नवीन नसून २००२ पासून काँग्रेसने मोदींच्या प्रतिमेला नुकसान पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही पंतप्रधान मोदींना जागतिक स्तरावर गौरव प्राप्त होत आहे. छत्तीसगडमध्ये अदानी समूहाने २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, तर राजस्थानमध्ये ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तामिळनाडूमध्ये डीएमके सरकारच्या काळात ४५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, तर तेलंगणमध्ये १०० कोटी रुपयांचा निधी कौशल्य विकासासाठी दिला आहे.

जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ज्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्या चारही राज्यांमध्ये (ओडिशा, तामिळनाडू, छत्तीसगड, आंध्रप्रदेश) विरोधी पक्षांची सत्ता होती. या राज्यांमध्ये भाजपचा कोणताही संबंध नव्हता, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT