Goa AAP President Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: राज्य सरकार म्हणजे भ्रष्टाचाऱाचा 'नरकासुर'! पालेकरांचा ‘कचरा’ योजनेवरुन घणाघात

Amit Palekar: ॲड. अमित पालेकर यांनी राज्यात लागू होणाऱ्या ‘डिपॉझिट रिफंड स्किम'' अंतर्गत नागरिकांची, पर्यटकांची पिळवणूक आणि फसवणूक होणार आहे व त्यामागे मोठा घोटाळ्याची भीती व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्य सरकार भ्रष्टाचाऱ्याच्या नरकासुरात बरबटलेले आहे. हेच सरकार भ्रष्टाचार संपविण्याची भाषा बोलणे हा सर्वात मोठा विनोद असल्याचा, आरोप करीत ॲड. अमित पालेकर यांनी राज्यात लागू होणाऱ्या ‘डिपॉझिट रिफंड स्किम'' अंतर्गत नागरिकांची, पर्यटकांची पिळवणूक आणि फसवणूक होणार आहे व त्यामागे मोठा घोटाळ्याची भीती व्यक्त केली.

आप’च्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. पालेकर यांच्यामवेत जॉन मास्कारेन्हास, फ्रान्सिस कुएल्हो, वाल्मिकी नाईक यांची उपस्थिती होती. ते म्हणाले की, १२ ऑगस्टला नवी अधिसूचना काढण्यात आली आहे.

एखादी प्लास्टिक बाटली खरेदी केली, तर त्यावर जीएसटी लावली जाणार आहे. त्याशिवाय डिपॉझिट रिफंड स्किम म्हणून काही रक्कमही वाढविली जाणार आहे. त्यामुळे २० रु.ची पाणी बाटली २५ ते ३० रु.ना खरेदी करावी लागणार आहे. तसेच जर एखाद्याने बाटली खरेदी केली तर त्याला डिपॉझिट म्हणून दुकानदाराकडे राहणारे ५ रुपये मिळविण्यासाठी त्याच दुकानात परत जावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: सायबर क्राईम रोखण्यासाठी गोवा पोलिस अलर्ट, 152 मोबईल नंबर केले ब्लॉक

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

SCROLL FOR NEXT