Amit Palekar, Vijai Sardesai, Cruz Silva, Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Goa Job Fraud: सध्या गोव्यात जो ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा उघडकीस आला आहे, त्‍याच्‍या मुळाशी जाण्‍याची गरज आहे. त्‍यासाठी न्यायिक आयोग स्थापन करा, अशी मागणी विरोधकाकडून करण्‍यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Job Scam India Alliance Press Conference

मडगाव: सध्या गोव्यात जो ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा उघडकीस आला आहे, त्‍याच्‍या मुळाशी जाण्‍याची गरज आहे. त्‍यासाठी न्यायिक आयोग स्थापन करा, अशी मागणी विरोधकाकडून करण्‍यात आली आहे.

इंडिया आघाडीचे घटक असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक ॲड. अमित पालेकर आणि आमदार क्रुझ सिल्वा यांनी मडगावात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

या घोटाळ्यात अटक केलेल्या संशयितांचे मागच्या वर्षभरातील कॉल डिटेल्स आणि त्यांचे फोन लोकेशन्स जनतेसाठी जाहीर करा, असे आव्हान आज विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

फेरेरा म्हणाले की, या प्रकरणांचा तपास योग्य तऱ्हेने होत नसल्यामुळेच आम्ही न्यायिक आयोगाद्वारे ही चौकशी व्हावी, अशी मागणी करत आहोत. आम्हाला जी माहिती मिळाली आहे, ती भयानक स्वरूपाची आहे.

‘तुफानी’ वेगाने जामीन मंजूर

मंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यालयात पूर्वी काम करणाऱ्या आणि ‘तुफान’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या संशयिताला फक्त ४८ तासांत ‘तुफानी’ वेगाने जामीन कसा मिळाला, असा सवाल सरदेसाई यांनी केला. मंत्र्यांच्या जवळ असलेले सुटावेत म्हणून पोलिस मुद्दाम न्यायालयाला माहिती देत नाहीत, असा आरोप ॲड. अमित पालेकर यांनी केला. पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी जे कोणी गेले, त्यांचे मोबाईल पोलिसांनी काढून घेतले, जेणेकरून या मोबाईलमध्ये जे पुरावे आहेत ते त्यांना नष्ट करता येतील.

काँग्रेसतर्फे आज निदर्शने

या प्रकरणातील पोलिस तपासावर सडकून टीका करताना सरदेसाई यांनी संशयितांनी आपण घेतलेले पैसे कुणाकडे पोहोचते केले, हे उघड केले आहे. पण, पोलिस ती बाब उघड करत नाहीत. या प्रकरणात अटक केलेल्या संदीप परब या अभियंत्याने दीड महिन्यापूर्वी याचप्रकरणी आर्थिक गुन्हेगारी विभागाकडे तक्रार केली होती. त्यात त्याने दीपश्री सावंत हिच्याकडे आपण पैसे दिले आणि तिने ते पैसे अन्‍य एका महिलेकडे दिले होते, असे म्‍हटले होते. ही महिला कोण, हे पोलिस अद्याप का जाहीर करत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, पणजीत शनिवारी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात येणार आहे.

टी-शर्ट घालून जनजागृती करणार

या घोटाळ्यात ‘गॉडफादर’ आणि ‘गॉडमदर’ही आहे, असे वक्तव्य मंत्री रवी नाईक यांनी केले होते. ही गॉडमदर कोण, हे जाणून घेण्यासाठी पोलिस रवी नाईक यांना चौकशीला का बोलावत नाहीत, असा सवाल सरदेसाई यांनी केला. गोवा सरकारने दोन ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे, तो फक्त या घोटाळ्याची निदर्शने इफ्फी आणि शवप्रदर्शनाच्या ठिकाणी होऊ नयेत यासाठीच, असा आरोप अमित पालेकर यांनी केला. मात्र, आम्ही या घोटाळ्याची माहिती देणारे टी-शर्ट घालून फिरू आणि सरकारला बाहेरच्या प्रतिनिधींसमोर उघडे पाडू, असा इशारा त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT