पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासाठी भगवंत मान यांची घोषणा केल्यानंतर आम आदमी पक्षाने अमित पालेकर यांना गोवा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. गोव्यातील इतर दिग्गज राजकारण्यांच्या तुलनेत 46 वर्षीय वकील अमित पालेकर हे राजकारणातील नवा चेहरा आहेत. आम आदमी पक्षाच्या या घोषणेने गोव्यातील (goa) अनेकांनाही आश्चर्य वाटत आहे. मात्र आता अमित पालेकरांनी (Amit Palekar) विरोधकांना चांगलेच वेठीस धरायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, नीलेश काब्राल यांच्यावर ते चांगलीच टीका करताना दिसत आहेत. आज त्यांनी त्यांच्या वाढत्या संपतीचा आलेख जनतेला वाचून दाखवला आहे. राज्यात आधी 50 % बेरोजगारी होती ती आज 75 % झाली आहे. मात्र नीलेश काब्राल यांची निवडणूक आयोग (Election Commission) देखील माहिती देईल की, त्यांचा महिन्याचा इनकम एक लाख होता आज त्यांचा इनकम 25 लाख रुपये दर महिना वाढला आहे. त्यांची परिस्थिती आज 3 हजार पटीने वाढली आहे. त्यांनी गोव्यात गोवेकरांच्या फायद्याचे व्यवसाय न राबवता त्यांनी स्वतःच्या फायद्याचे व्यवसाय गोव्यात उभारले असल्याचे मत मांडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.