Amit Palekar
Amit Palekar  Dainik Gomantak
गोवा

Amit Palekar : शंभर टक्के ‘हर घर जल’ चा दावा खोटा

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील अनेकांना आजही विविध कारणास्तव नळजोडणीचा फायदा घेणे अशक्य झाले आहे. प्रत्येक घरात नळजोडणीच शक्य झाले नाही तर ''हर घर जल'' प्रमाणपत्राचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला फसव्या घोषणा करून मूर्ख बनवण्याचे प्रकार थांबवावेत.

''हर घर जल'' योजना प्रमाणपत्र मिळवणारे गोवा हे पहिले राज्य ठरल्याचा त्यांचा दावा हा धादांत खोटा असल्याची टीका आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केली प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

(Amit Palekar slams goa government over har ghar jal scheme)

राज्यात अशी अनेक गावे आणि वसाहती आहेत जिथे पाण्याचे वाहिन्यांच्या जोडण्या मिळालेल्या नाहीत आणि जेथे जलवाहिन्या टाकल्या आहेत, तेथे पाणीपुरवठा होत नाही. गोव्यात दर आठवड्याला कुठे ना कुठे पाणीपुरवठ्याअभावी संतापलेल्या नागरिकांकडून आंदोलन केले जाते. शंभर टक्के हर घर जल, असे पोकळ दावे करून भाजप जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे. डॉ. सावंत यांनी गेल्या वर्षी गोवा शंभर टक्के हागणदारी मुक्त झाल्याचा दावा केला होता. ''हर घर जल'' दावा हागणदारी मुक्त गोवापेक्षाही धादांत खोटा आहे, पालेकर यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या ''हर घर जल'' या संकेस्थळवरच्या माहितीवरून असे दिसून येते की कालच्या घोषणेमध्ये 2.63 लाख कुटुंबांना वाहिनीद्वारे पाणी पुरवल्याचा दावा यापूर्वीच सप्टेंबर 2020 मध्ये केला गेला होता.

मोदी सरकारच्या संकेतस्थळनुसार, सप्टेंबर 2020 पासून गोव्यातील एककाही घराला पाण्याची वाहिनी जोडली गेली नाही, मग ही अचानक घोषणा कशासाठी आहे? सरकारने प्रत्यक्षरित्या केलेल्या कामाच्याबाबतीत दाखवण्यासारखे काहीच नसल्यामुळे भाजप सरकार एक ‘इव्हेंट व्यवस्थापन सरकार'' बनले आहे. आपल्या अक्षमतेची लाज बाळगण्याऐवजी, सरकार बनावट उत्सव, फलक आणि प्रसिद्धी यासाठी करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करत आहे.

दौऱ्याचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

आजही राज्यात अनेक अशी ठिकाणे आहेत, जिथे पाण्यासाठी जनता पायपीट करत आहे. आम आदमी पार्टी या ठिकाणांचे माहिती संकलित करीत आहे. लवकरच भाजप सरकारचे खोटे दावे पक्ष उघड करणार असून, अशी ठिकाणे पाहण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना दौरा करण्याचे निमंत्रण आपण देत आहोत, असे पालेकर यांनी नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

SCROLL FOR NEXT