भाजपविरोधी निर्माण झालेल्या ‘इंडिया’ आघाडीची पहिली चाचणी चंदिगढ महापौर निवडीत झाली होती. परंतु भाजपने लोकशाहीला तडा देत आपला उमेदवार महापौर बनविला.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने भाजपचा हा डाव मोडीत काढला आहे, त्यामुळे त्याठिकाणी इंडिया आघाडीचा उमेदवार महापौर झाला आहे. सर्वोच्च न्यायालय ही अप्रत्यक्ष संघटना असल्याने न्याय मिळाला आहे, असे ‘आप’च्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद घेत सांगितले.
आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर म्हणाले, भाजप सत्तेत राहण्यासाठी फसवेगिरी करीत असल्याचे मागील पत्रकार परिषदेत सांगितले. चंदीगडच्या महापौर निवडीत इंडिया आघाडीचा पहिला विजय होणार असल्याचे आम्ही सांगितले. आप आणि काँग्रेस असे २० नगरसेवक होते, तर भाजपचे १६ मते होते.
परंतु निवडीच्यावेळी निवडणूक अधिकाऱ्याने आठ मते बाद ठरविली आणि भाजपचा महापौर झाला. परंतु त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो, तेथे तेथे न्यायालयाने आठही मते वैध ठरविली. त्यामुळे आपचा महापौरपदाचा उमेदवार विजयी ठरला. भाजपला स्वतःच्या नेत्यांवर विश्वास नाही, म्हणूनच इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेत आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भाजपला आता स्वतःकडे येणाऱ्या निधीविषयी माहिती द्यावी लागणार आहे. भाजपचा हा पापाचा घडा भरला आहे, असा आरोप पालेकर यांनी केला आहे.
लवकरच जागा वाटप
लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर होईल, तो निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू. दोन दिवसांनी जागा वाटपावर निर्णय होणार आहे, त्यानंतर उमेदवार ठरेल. आम्ही काँग्रेसबरोबर चर्चा करून राज्याच्या भल्यासाठी निर्णय घेतला जाईल, असे ॲड. पालेकर म्हणाले. याप्रसंगी वाल्मिकी नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.