Amit Palekar filed a complaint against Sunburn organizers Panaji police station Dainik Gomantak
गोवा

गोव्यात नियोजित सनबर्न विरोधात राजकारण तापलं; आपकडून पणजी पोलिसांत तक्रार

AAP state president Adv Amit Palekar: यंदाचा सनबर्न फेस्टिव्हल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सनबर्न आयोजनाच्या ठिकाणावरुन राज्यात सध्या राजकीय वादंग निर्माण झाला आहे.

Manish Jadhav

पणजी: यंदाचा सनबर्न फेस्टिव्हल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सनबर्न आयोजनाच्या ठिकाणावरुन राज्यात सध्या राजकीय वादंग निर्माण झाला आहे. विरोधक सातत्याने या मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतायेत.

यातच आता, गोव्यातील आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सनबर्न आयोजकांविरुद्ध तक्रार नोंदवली.

पालेकर यांनी यावेळी सरकारकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जोरकसपणे तिकीट विक्री सुरु असल्याचा आरोप केला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत राजधानी पणजी येथील पोलिस स्थानकात या आयोजकांविरुद्ध रितसर अशी पोलिस तक्रार नोंदवली. पालेकर यांनी आम आदमी पक्षाचा अशा प्रकारच्या तिकीट विक्रीला विरोध असल्याचे सांगितले.

याचदरम्यान, सनबर्न फेस्टिव्हल ही गोव्याची संस्कृती नसल्याचे म्हणत काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी घणाघात केला होता. सनबर्नच्या माध्यमातून गोव्यात ड्रग्ज कल्चर फोफावेल असेही पालेकर म्हणाले होते.

दरवर्षी सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन उत्तर गोव्यातील वागतोर येथे आयोजन केले जाते. मात्र यंदाचे सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाचे ठिकाण दक्षिण गोवा असल्याचे आयोजकांकडून घोषणा करताच विरोधाची लाट उसळली. दक्षिण गोव्यातील (South Goa) राजकीय पुढाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला. एवढचं नाहीतर दक्षिण गोव्यातील ग्रामसभांनी सनबर्नच्या विरोधात ठराव मंजूर करुन आपला विरोध दर्शवला.

दुसरीकडे, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी तर सरकार सनबर्न फेस्टिव्हलच्या माध्यमातून दक्षिण गोव्यात ड्रग्ज कल्चर आणू पाहत असल्याचा घणाघात केला. याशिवाय, आम्ही दक्षिण गोव्यात सनबर्नचे आयोजन बिलकुल होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.

तसेच, वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा व बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी या फेस्टिव्हलला आपला विरोध असून जे कोण या फेस्टिव्हलला विरोध करतात त्यांना आपला पूर्ण पाठिंबाही जाहीर केला. क्रुझ सिल्वा यांनी सांगितले की, या फेस्टिव्हलमुळे उत्तर गोव्याची (North Goa) काय परिस्थिती झाली आहे हे आम्ही पाहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT