Goa American citizen Dainik Gomantak
गोवा

Goa American citizen: गोव्यातील विदेशींच्या वास्तव्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! नेपाळला जाणाऱ्या अमेरिकन नागरिकाला यूपीतील सोनौली सीमेवर अटक

Nepal Border Arrest: उत्तर प्रदेश पोलिसांच्या माहितीनुसार, ब्राऊनने थायलंड दौऱ्यादरम्यान आपला पासपोर्ट हरवल्याचा दावा केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील सोनौली सीमेवर पासपोर्ट व अन्य वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय नेपाळमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकन नागरिकाला सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) ताब्यात घेतल्यानंतर तो गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्यात वास्तव्यास असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ही माहिती यापूर्वी कोणत्याही सरकारी यंत्रणेसमोर आली नसल्याचे दिसून येत असल्याने गोव्यात विदेशी नागरिकांची नोंद, पडताळणी आणि हालचालींवर ठेवण्यात येणाऱ्या देखरेखीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीने स्वतःची ओळख कॅलिफोर्निया येथील अमेरिकन नागरिक जॉर्डन ब्राऊन अशी दिली आहे. त्याच्याकडे कोणतेही वैध प्रवासी दस्तऐवज नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या माहितीनुसार, ब्राऊनने थायलंड दौऱ्यादरम्यान आपला पासपोर्ट हरवल्याचा दावा केला आहे. त्यानंतर तो समुद्रमार्गे श्रीलंकेत पोहोचला आणि तेथून २ नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा समुद्रमार्गाने भारतात दाखल झाला. भारतात आल्यानंतर त्याने गोव्यात वास्तव्यास सुरुवात केली आणि अनेक महिने येथे राहिल्यानंतर कोणतेही अधिकृत प्रवासी कागदपत्र नसतानाच नेपाळात जाण्याचा प्रयत्न केला.

११ जुलै रोजी सोनौली सीमेजवळ नेपाळमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात एसएसबीने त्याला अडविले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे पासपोर्ट, व्हिसा किंवा अन्य कोणतेही वैध प्रवासी दस्तऐवज आढळले नाहीत. त्यानंतर विविध शासकीय यंत्रणांनी त्याच्या दाव्यांची पडताळणी सुरू केली असून सोनौली पोलिस ठाण्यात स्थलांतर व विदेशी नागरिकांशी संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित अमेरिकन नागरिक गोव्यात नेमका कुठे राहत होता, कोणाच्या संपर्कात होता, कोणत्या माध्यमातून त्याने वास्तव्याची व्यवस्था केली आणि या काळात त्याची कोणत्या यंत्रणेकडून पडताळणी झाली होती का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

उपस्थित झालेले महत्त्वाचे प्रश्न

वैध पासपोर्ट नसलेला विदेशी नागरिक अनेक महिने गोव्यात कसा राहिला?

स्थानिक स्तरावर त्याची पोलिस पडताळणी झाली होती का?

विदेशी नागरिकांच्या नोंद व देखरेख व्यवस्थेत त्रुटी आहेत का?

केंद्र व राज्य यंत्रणांमधील माहितीची देवाणघेवाण प्रभावीपणे होत आहे का?

या घटनेनंतर गोव्यातील विदेशी नागरिकांच्या पडताळणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार का?

कोणत्याही वैध कागदपत्रांविना गोव्यात वास्तव्य

या संपूर्ण प्रकरणामुळे गोव्यात विदेशी नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भातील यंत्रणा किती प्रभावी आहे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परदेशी नागरिकांनी स्थानिक पोलिसांकडे नोंद करणे, त्यांच्या वास्तव्याची माहिती संबंधित यंत्रणांकडे उपलब्ध असणे आणि त्यांच्या हालचालींवर आवश्यक तेवढी देखरेख ठेवणे अपेक्षित असते. मात्र, कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचा दावा करणारी व्यक्ती अनेक महिने गोव्यात वास्तव्यास होती आणि ही बाब राज्यातील यंत्रणांच्या निदर्शनास आली नाही, हे चिंताजनक मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT