चिखली उपजिल्हा इस्पितळातील डिझेल नसल्याने बंद पडलेल्या रुग्णवाहिका. Dainik Gomantak
गोवा

चक्क डिझेल नसल्याने रुग्णवाहिका पडली धूळखात; रुग्णांचे हाल

आरोग्य संचालकाने (Director of Health) वरील बाबींवर लक्ष घालून उपाययोजना आखावी व रुग्णांना (Patients) चांगली सेवा उपलब्ध करावी, अशी मागणी तारा केरकर यांनी केली.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: चिखली उपजिल्हा इस्पितळातील (Sub-District Hospital) चार रुग्णवाहिका डिझेल (Diesel) नसल्याने धूळखात पडल्या आहे. इस्पितळातील रुग्णांसाठी 108 रुग्णवाहिकेचा उपयोग करीत असल्याने अपघातस्थळी उपयोगात 108 रुग्णवाहिकेची गैरसोय होत असल्याची टीका मुरगावची माजी नगराध्यक्षा तथा 'सवेरा' बिगर सरकारी संस्थेच्या अध्यक्षा तारा केरकर यांनी केली.

चिखली उपजिल्हा इस्पितळातील रूग्णाच्या सोयीसाठी असलेल्या चार रुग्णवाहिका डिझेलची बिले न भरल्याने सध्या इस्पितळातील परिसरात धूळखात पडलेल्या आहे. याविषयी माहिती देताना सवेरा बिगर सरकारी संस्थेच्या अध्यक्षा तारा केरकर (Tara Kerkar) म्हणाल्या की एका उद्योगपतीने स्थानिक आमदार पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Mavin Gudinho) यांच्या मागणीनुसार नवीन सामग्री असलेल्या रुग्णवाहिका कोविड महामारी वेळी पुरस्कृत केली होती. तसेच आरोग्य संचालकाने या तीन रुग्णवाहिका चिखली उपजिल्हा इस्पितळाला पुरवल्या होत्या. एवढी सेवा देऊन सुद्धा उपजिल्हा इस्पितळातील चार रुग्णवाहिका डिझेल नसल्याने बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती केरकर यांनी दिली.

पंचायतमंत्री (Panchayat Minister) माविन गुदिन्हो यांनी आपल्या स्वार्थासाठी या उपजिल्हा इस्पितळाचा उपयोग केला आहे. जनतेची सेवा करताना आरोग्याची (health) सेवा देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीने पुढाकार घ्यावा. उगाच मोठेपणा सांगून दाबोळी येथील जनतेला फसवण्याचा प्रयत्न करू नये अशी माहिती केरकर यांनी दिली. गेल्या काही दिवसापासून चिखली उपजिल्हा इस्पितळातील चार रुग्णवाहिकेची डिझेलची बिले न भरल्याने येथील रुग्णांना 108 रुग्णवाहिकेचा (Ambulance) उपयोग करावा लागतो. आरोग्य संचालकाने वरील बाबींवर लक्ष घालून उपाययोजना आखावी व रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करावी अशी मागणी शेवटी तारा केरकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT