Ambulance Dainik Gomantak
गोवा

Ambulance Fire: सावंतवाडीतून गोव्यात रुग्ण उपचारासाठी घेऊन येत असलेल्या रुग्णवाहिकेने घेतला पेट; मोठा अनर्थ टळला

Ambulance Gutted in Fire At Goa: घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

Pramod Yadav

Ambulance from Sawantwadi en route to GMC with patient catches fire

पेडणे: सावंतवाडीतून गोव्यात उपचारासाठी रुग्ण घेऊन येत असलेल्या रुग्णवाहिकेने अचनाक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. महाखाजन, धारगळ येथे सोमवारी (१७ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सांवतवाडीतून रुग्ण घेऊन एक रुग्णवाहिका गोव्यात येत होती. बांबोळी येथील गोवा महाविद्यालयाच्या रुग्णालयात रुग्णाला उपचारासाठी दाखल केले जाणार होते. दरम्यान, धारगळ येथील महाखाजन येथे आल्यावर रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

रुग्णवाहिकेने पेट घेताच प्रसंगावधान राखत रुग्णाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. पुढे रुग्ण गोवा महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे रुग्णवाहिकेला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत कोणालाही दुखापत झाली नसली तर रुग्णवाहिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्गातून अनेक रुग्ण उपचारासाठी येतात गोव्यात

सिंधुदुर्ग, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण गोव्यात उपचारासाठी येत असतात. अत्याधुनिक उपचार आणि जलद मिळणारी सेवा यामुळे अनेकजण सिंधुदुर्गातून गोव्यात येत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT