Ambedkar Statue In Pernem  Dainik Gomantak
गोवा

Ambedkar Statue In Pernem : ..तर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण करणार - तुकाराम तांबोसकर

तुकाराम तांबोसकर : पेडणेत आंबेडकर पुतळा 7 वर्षे अनावरण प्रतीक्षेत

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे : पेडणे येथे नगरपालिका उद्यानात घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचधातूचा पुर्णाकृती पुतळा गेली सात वर्षे अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे, ही बाब स्थानिक आमदारांसह सर्व संबधितांच्या अनेकदा निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही मागणी पूर्ण होत नसेल तर 131 व्या जयंती दिवशी 14 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ आपण आमरण उपोषणास बसू , असा इशारा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम तांबोसकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, आमदार तसेच पालिकेला दिला आहे.

तांबोसकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, 1987 मध्ये तत्कालीन सरपंच परशुराम कोटकर यांनी बालोद्यान असलेल्या जागेत उदार अंतःकरणाने बाबासाहेबांचा सिमेंटचा पुतळा उभारणीसाठी येथे जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे राज्यात cयांचा पहिला पुतळा उभा राहिला. ज्याचे अनावरण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते झाले.

त्यानंतर हा पुतळा जीर्ण झाल्याने 2016 मध्ये नवा पंचधातूचा पुतळा बसविण्यात आला. या पुतळ्याचे रितसर अनावरण व्हावे, लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार प्रवीण आर्लेकर यांना दोनदा लेखी निवेदन सादर केले.त्यानंतर पालिकेच्या कार्यक्रमात आमदार आर्लेकर हे उपस्थित होते. त्यांच्याशी या पुतळ्या संबधी चर्चा केली. त्यांनी अनावरण करूया, असे आश्वासन दिले. पण अद्याप कसलेही सहकार्य मिळाले नाही असेही तुकाराम तांबोसकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

पेडणे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष !

पेडणे नगर पालिकेला अनेकदा लेखी निवेदने देऊन तसेच तोंडी माहिती देऊनही जाणूनबुजून पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पुतळ्याच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. हा कचराही पालिका साफ केला जात नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्य घटनेवर देश चालतो.पण पेडणे पालिका त्याकडे दुर्लक्ष करते, असेही तांबोसकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT