Fuel leak In Goa
Fuel leak In Goa Dainik Gomantak
गोवा

Fuel Leak Issue: दाबोळीत इंधनगळतीची जागा सापडली; तरीसुद्धा काही प्रश्‍‍न अद्याप अनुत्तरीतच

दैनिक गोमन्तक

Fuel Leak Issue: व्हडलेभाट, चिखली-दाबोळी परिसरात झुआरी इंडियन ऑईल कंपनीच्या भूमिगत इंधनवाहिनीला गळती लागलेले ठिकाण अखेर सापडले. आल्त-दाबोळी येथील वालिस जंक्शनसमोरील इंधनवाहिनीला भेगा पडल्यामुळे इंधन गळती होत असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीप्रसाद नाईक यांनी दिली.

तब्‍बल 16 दिवसांनंतर ठिकाण सापडले, असे कंपनीतर्फे सांगण्‍यात आले. दरम्‍यान, गळतीच्‍या ठिकाणावरून इंधनाची चोरी होत होती का, याचे उत्तर अद्याप सापडलेले नाही.

झुआरी इंडियन ऑईल कंपनीच्या कारभारावर अजूनही ग्रामस्‍थ नाराज आहेत. आल्‍त दाबोळी पठारावर वालिस जंक्शनपेक्षा व्हडलेभाट-चिखली हा भाग खाली आहे.

इंधनाला गळती लागली असती तर ते व्हडलेभाट-चिखली येथे कसे पोहोचले? या प्रश्‍‍नाचे उत्तर कंपनीकडे नाही.

भूमिगत इंधन गळतीचे ठिकाण सापडल्याचे कळताच मुरगावचे उपजिल्हाधिकारी तथा मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे प्रमुख भगवंत करमली, मामलेदार प्रवीणजय पंडित घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तेथे अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर व जवान उपस्थित होते.

या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी राज्य गृह विभागाने पुढाकार घ्‍यावा. यात काही तरी काळेबेरे आहे. कंपनी व मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन समिती जनतेपासून काही तरी लपवत आहे.
- नीलम नाईक, पंचसदस्‍य
गळती लागलेली इंधनवाहिनी पूर्णत: बदलण्यास सांगितले आहे. तसेच संबंधितांना नोटिसा पाठवल्या असून दोषींवर कारवाई केली जाईल. कंपनीने इंधनवाहिनीची वेळीच दुरुस्‍ती करायला हवी होती.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: गोव्यात आज ऑरेंज अलर्ट तर उद्यापासून 8 तारखेपर्यंत यलो अलर्ट; हवामान खात्याची माहिती

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

SCROLL FOR NEXT