Manohar Ajgaonkar of BJP

 

Dainik Gomantak 

गोवा

मी गोव्यात भाजपला बळकट करण्यासाठी मदत केली असली तरी..: आजगावकर

प्रवीण आर्लेकर यांना पेडणे (Pernem) मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यातच अनेक नेते तिकीट मिळवण्यासाठी पक्षांतराचा मार्ग अवलंबत आहेत. परिणामी पक्षाशी एकनिष्ठ असलेले नेते नाराजी नाट्य करत आहेत. प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे, यावर उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर (Manohar Ajgaonkar) यांनी नाराजी व्यक्त केली.

आगामी निवडणुकीसाठी भाजपचे (BJP) तिकीट नाकारले जाण्याची शक्यता असलेले उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी सोमवारी भाजपवरच निशाणा साधला. ते म्हणाले, "मी राज्यात भाजपला बळकट करण्यासाठी मदत केली असली तरी, सरकारने जाहीर केलेल्या 10,000 नोकऱ्यांपैकी मला कोणतीही नोकरी मिळालेली नाही."

आर्लेकर यांना पेडणे (Pernem) मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. "भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मला सांगितले की आर्लेकर यांचे वडील चरस विकायचे... ते (आर्लेकर) ड्रग्ज विकायचे आणि आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला," असे आजगावकर म्हणाले. आजगावकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, "मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बहुजन समाजाचे नेते आहेत, असे मी लोकांना सांगायचे, पण आता त्यांनी 10,000 सरकारी जागा भरल्यानंतरच ते बहुजन समाजाचे नेते असल्याचे मी मान्य करेन."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

SCROLL FOR NEXT