Goa Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Goa News : केपे मामलेदार कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी पर्यायी विचार; आमदार डिकॉस्तांचा सवाल

Goa Assembly Session : केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी विधानसभेत शून्य तासाला हा विषय उपस्थित केला होता. डिकॉस्ता यांनी मामलेदार कार्यालय इमारतीच्या छताच्या कॉंक्रिटचे तुकडे पडू लागल्याकडे सरकारचे लक्ष वेधले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, केपे मामलेदार कार्यालय बाजार संकुल इमारतीत हलवल्यास तेथे नवी इमारत बांधता येईल. त्या शक्यतेचा विचार सरकार करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी विधानसभेत शून्य तासाला हा विषय उपस्थित केला होता. डिकॉस्ता यांनी मामलेदार कार्यालय इमारतीच्या छताच्या कॉंक्रिटचे तुकडे पडू लागल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा तोडगा सुचवला.

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी विठ्ठलदासवाडा-मोरजी येथे दोन होड्या काल जाळल्या गेल्याकडे लक्ष वेधले. त्यावर पोलिस चौकशी करतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये म्हणाले, गोव्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे डिचोलीतील लोकांच्या मनात भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. काल डिचोलीत २ मंदिरांत चोऱ्या झाल्या. गोव्यातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करून या वाढत्या चोऱ्या, प्रतिबंधात्मक उपायांनी थांबवाव्यात.

सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले, सांतआंद्रे मतदारसंघातील विविध ठिकाणचे पथदिवे कार्यान्वित नाहीत. दांडी आगशी, पाळे, गवळी-मौला, सांतान, कुडका, बाती, गोवा वेल्हा यासारख्या ठिकाणचे पथदीप बंद आहेत. यामुळे मतदारसंघातील लोकांना त्रास होत आहे.

त्यांची सेवा नियमित करावी

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर म्हणाले, मुरगाव नगरपालिकेतील रोजंदारी/कंत्राटी कामगारांच्या सेवा सरकारच्या अनेक आश्वासनांनंतरही नियमित केल्या जात नाहीत. यातील बहुतांश कामगार १५ वर्षांहून अधिक काळ काम करत आहेत. ते सर्व प्रकारची कामे करतात. त्यांच्या सेवा नियमित करण्याची मागणी आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढतो, असे नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT