Market Dainik Gomantak
गोवा

Fish Became Expensive: भाजी, फळांबरोबरच मासळीही महागली

बांगडा 100 रुपये किलो : इसवण 700 तर पापलेट 1000 रुपये किलो

गोमन्तक डिजिटल टीम

मासळी दरात दिवसेंदिवस वाढ होत आहेत. भाजी, फळांचे दर वाढले असून आत्ता मासेही महागले असून दिवसेंदिवस दरात वाढ होत आहे.

अलीकडेच सिलिंडरचे वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लावत आहेत. गोमंतकीयांच्या स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक म्हणजे मासळी परंतु आता मासळीचे दरही वाढले आहेत. काही महिन्यांपासून मासळीच्या दरात चढउतार सुरू आहेत.

पणजीत बांगडे 100 ते 150 किलो प्रती किलो दराने विकले जाते. इसवण 700 तर पापलेट 1 हजार रुपये किलो दराने विकला जात आहे.

पापलेट देखील 1हजारांवर पोहोचली आहे. आज पणजी मासळी बाजारात इसवण, कर्ली, लेपो, माणकी, खुबे, कोळंबी, समुद्री खेकडे आदी विविध प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात विक्रीस उपलब्ध होती.

सकाळी 9 च्या सुमारास मासळी खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ अधिक होती. वाट्याच्या दराने लहान बांगडे 150 रुपयांना 8 या दराने उपलब्ध होते.

खाऱ्या बांगड्यांचा वापर..

गोमंतकीय पद्धतीने केलेले मासळीचे कालवण (हुमण), फिश फ्रायचा आस्वाद चाखण्यासाठी अनेक खवय्ये तसेच पर्यटक गोव्यात येतात; मात्र वाढत्या मासळीच्या दरामुळे मासळी प्लेटच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणाला तळलेली मासळी आवडते तर कुणाला हुमणातली, कुणाला इसवणाची पोस्ता आवडतात तर कुणाला प्रॉन्स फ्राय; मात्र काहींना तर दररोजच्या जेवणात मासळी लागतेच लागते.

अशावेळी मध्यमवर्गीयांना देखील ताज्या मासळी व्यतिरिक्त सुक्या खाऱ्या बांगड्यांचा वापर वाढला आहे. मासळीच्या तुलनेत इसवण आणि पापलेटच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhoma: 'मातीच्या भरावामुळे गाव धोक्यात'! भोम ग्रामसभेत संताप; चौपदरी रस्त्याचा प्रश्‍नही चर्चेत

Goa Live News: सावर्शे सत्तरी येथे मुख्य रस्त्यावर आंब्याचे झाड पडून रस्ता वाहतुकीस बंद

Goa Dams: ‘साळावली’, ‘अंजुणे’ची होणार दुरुस्‍ती! 58 कोटींचा निधी मंजूर; DPR तयार

Goa Politics: खरी कुजबुज; हाऊस फूल इस्पितळ

Goa Bad Roads: 1400 कोटी खर्च, पण रस्त्यावर खड्डेच; 'बीजेपीचे बुराक' मोहिमेत पालेकरांची टीका; रस्त्यांवर बसून केले आंदोलन

SCROLL FOR NEXT