Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway RTI: काम अपूर्ण, खर्च दुप्पट; मुंबई - गोवा महामार्गावर 12 वर्षात 7,300 कोटी खर्च

मुंबई- गोवा महामार्गासाठी केंद्र सरकार आणि राज्य बांधकाम विभागाने आत्तापर्यंत 7,300 कोटी रुपये खर्च केले आहेत.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway RTI

मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम मागील बारा वर्षापासून रखडले आहे. बारा वर्षात महामार्गाच्या कामावर नियोजित खर्चापेक्षा दुप्पट खर्च झाल्याचे समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या आरटीआयमधून ही माहिती समोर आली आहे.

मुंबई-गोवा 440 किमी महामार्गावरील 112 किमी मार्गाचे अद्याप चारपदरीकरण बाकी असून, महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी यापूर्वी डिसेंबर 2023 ची मुदत होती.

जितेंद्र घाडगे यांनी आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गासाठी केंद्र सरकार आणि राज्य बांधकाम विभागाने आत्तापर्यंत 7,300 कोटी रुपये खर्च केले आहेत.

यामध्ये महामार्गाचे चौपदरीकरणासह बोगदे, उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि बाह्य रस्ते यांचा समावेश आहे. मुंबई- गोवा महामार्गाच्या कामासाठी 3,500 ते 4,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.

पनवेल ते इंदापूर पर्यंतचा 84 किमीचा मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात आला. त्यानंतर उरलेल्या 355 किमी मार्गाचे काम राज्य बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले.

यासाठी सुरुवातीला 900 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, दरम्यान, सध्या या मार्गासाठी आत्तापर्यंत 1,200 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्याप 28 किमी मार्गाचे रुंदीकरणाचे काम शिल्लक आहे.

तसेच, राज्य बांधकाम विभागाकडे असलेल्या कामासाठी आत्तापर्यंत 6,100 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्याप 84 किमी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम शिल्लक आहे.

मुंबई- गोवा महामार्गावर 2010 पासून 2,500 जणांचा मृत्यू झाला आहे, असे घाडगे यांनी मिळलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT