Sao Jose de Areal
Sao Jose de ArealDainik Gomantak

Sao Jose de Areal: 'गुन्हे मागे घेऊ नका, दोषींवर कठोर कारवाई करा'; शिवप्रेमींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शिवजयंतीला शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करून परत जाताना समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर माती उधळून ढेकळांनी हल्ला करण्यात आला.
Published on

Sao Jose de Areal

सां जुझे द आरियल येथे एका खासगी जागेत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद झाला. शिवजयंतीला शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करून परत जाताना समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर माती उधळून ढेकळांनी हल्ला करण्यात आला.

या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांत 20 जणांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी होत असताना, गुन्हे मागे न घेता दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमींनी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे केलीय.

सां जुझे द आरियल प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. सरकारने या दबावाला बळी पडून गुन्हे मागे घेऊ नयेत, उलटपक्षी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवप्रेमींनी 26 फेब्रुवारी रोजी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांना दिले आहे.

पंचायतीची परवानगी न घेता पुतळा उभारल्याचा स्थानिकांचा आरोप असल्यास त्यांनी हा प्रश्न योग्य व्यासपिठावर मांडला पाहिजे होता. कायदा हातात घेण्याचा अधिकार नागरिकांना कोणी दिला? असा प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.

Sao Jose de Areal
New Zuari Bridge: गोवा सरकारचे 270 कोटींचे कंत्राट मिळाले, कंपनीच्या शेअर्सला होणार फायदा

पोलीस बंदोबस्त असताना मंत्री फळदेसाई यांच्यावर हल्ला करण्यात आला. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना अडवण्याचे धाडस स्थानिकांना कुठून आले? पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शिवप्रेमींनी निवेदनातून केली आहे.

दरम्यान, यावेळी शिवप्रेमींनी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्यावर झालेल्या हल्याच्या संदर्भात सदिच्छा भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com