Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: स्वतःचे लपवून दुसऱ्याला दोष देण्यात भाजप सर्वात पुढे...

सुश्मिता देव: विकास पाहायचा असेल, तर बंगालला चला

दैनिक गोमन्तक

सांगे: आज नेटवर्कशिवाय काहीच हालचाली होत नाही, मग डिजिटल क्षेत्रात काय साध्य केले. केंद्र सरकार सर्व क्षेत्रात अपयशी ठरले आहे. पश्चिम बंगाल सरकारने काय विकास केला ते पाहायचे असल्यास थेट बंगालला चला आणि मगच आम्हाला दोष द्या. स्वतःचा दोष लपविण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्यास भाजप (Goa BJP) सर्वात पुढे आहे. असा आरोप खासदार सुश्‍मिता देव यांनी केला. त्या सांगे येथील गुरुकुल सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Allegations against BJP by goa tmc)

त्या म्हणाल्या, राज्यातील सर्वांगीण विकास करण्यासाठी आता राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून ती भरून काढण्यासाठी गोव्यातील जनता तृणमूल काँग्रेसशिवाय दुसऱ्या पक्षाला निवडून देणार नाही. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गोवा प्रभारी खासदार सुश्मिता देव पुढे म्हणाल्या, की सांगेसारख्या ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी तृणमूल काँग्रेस कटीबद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया करण्यासाठी घोषणा केल्या जात असताना सांगेसारख्या भागात कोणत्याही भागात नेटवर्क नाही, मग तुमच्या सरकारने काय केले हे जनतेसमोर उपस्थित केले जाणार आहे.

यावेळी व्यासपीठावर तृणमूलच्या (Goa TMC) सांगे प्रभारी राखी प्रभुदेसाई, कांता गावडे, वाडे कुर्डीचे सरपंच डोमॅसीयो बार्रेटो, आनंद वेळीप, रिवणचे माजी सरपंच दामोदर वेळीप, माजी उपसरपंच आर्यकुमार जांबवलीकर उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी खासदार सुश्मिता देव यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सांगेचे आराद्य दैवत श्री पाईकदेवाचे दर्शन घेतले.

‘जलवाहिन्यांचा घोटाळा उघड करणार’

2012 साली निवडून आलेले सुभाष फळदेसाई आणि 2017 साली निवडून आलेले प्रसाद गावकर यांनी जनतेला पाणी पुरविण्यासाठी वेगवेगळ्या दोन जलवाहिन्या घातल्या, पण पाणी कोणीच दिले नाही. यात झालेला भ्रष्टाचार उघडा पाडण्यासाठी सखोल चौकशी तृणमूल काँग्रेसतर्फे (Goa Congress) करण्यात येणार असल्याचा इशारा सुश्मिता देव यांनी दिला.

‘संजीवनी’ बंद करण्यासाठीच केंद्रीय स्कूलचा विषय

साळावली धरणग्रस्थाचा विषय हाताळताना सुश्मिता देव म्हणाल्या, की काही धरणग्रस्तांना भूखंड दिले, पण पाणी दिले नाही, तर कित्येक धरणग्रस्तांना अजूनही भूखंड दिले नाही. धरणग्रस्तांचा रोजीरोटीचा प्रश्न म्हणजे संजीवनी साखर कारखाना. तोसुद्धा बंद पाडून राज्य सरकार अपयशी ठरले आहे. संजीवनीची जमीन केंद्रीय विद्यालयाला देण्यास आमचा विरोध नसून अन्य ठिकाणी केंद्रीय स्कूल सुरू करता आले असते, पण संजीवनी बंद पाडण्यासाठीच केंद्रीय स्कूल संजीवनी जमिनीत सुरू करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT