Margao Jama Masjid Dispute Dainik Gomantak
गोवा

Margao Jama Masjid: मडगाव मशिदीचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचा आरोप

Margao Jama Masjid Dispute: निवडणुका न घेता न्यायालयातसुद्धा बनावट कागदपत्रे दाखवून फसवले आहे; कादर शाह

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मालभाट - मडगाव येथील जामा मशिदीचा ताबा बेकायदेशीरपणे उर्फान मुल्ला व त्यांच्या साथीदारांनी घेतला असून निवडणुका न घेता न्यायालयातसुद्धा त्यांनी बनावट कागदपत्रे दाखवून फसवले आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आम्हाला हा प्रश्न सोडवण्याचे आश्र्वासन दिले होते, पण तेच त्या गटाबरोबर आहेत, असे मडगाव मुसलमान असोसिएशनचे अध्यक्ष कादर शाह यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

आम्ही सोमवारी परत एकदा आमदार दिगंबर कामत तसेच फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांना निवेदन सादर करणार आहोत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रश्र्न सोडवावा अशी त्यांनाही विनंती करणार आहोत, असे शाह यांनी सांगितले.

उर्फान मुल्ला सतराही मशिदींचे लोक आपल्याबरोबर आहेत असे सरकारला दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण प्रत्यक्षात त्यात काडीमात्र तथ्य नसल्याचे शाह यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अब्दुल बेपारी, शफी शेख, इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘जामा मशिदीच्या दारात बाऊन्सर’

जर समितीत स्थान मिळवायचेच असेल, तर निवडणुकीला सामोरे जा असे आमचे उर्फान मुल्ला व त्यांच्या साथीदारांना आव्हान आहे. सध्या जामा मशिदीच्या दारात बाऊन्सर ठेवले आहेत व दर शुक्रवारी नमाज पढण्यास जाताना आम्हाला तिथे धोका असल्याचे जाणवते. त्यामुळे कित्येक मुसलमानांनी त्या मशिदीमध्ये जाणेच बंद केल्याचे कादर शाह यांनी सांगितले. तक्रार करूनही पोलिसही काहीच कारवाई करीत नसल्याचे ते म्हणाले. गेले एक वर्ष हे प्रकरण चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘जामा मशीद ताब्यात घेऊ देणार नाही’

जामा मशिदीचे ५०४ सदस्य आहेत. या संस्थेची केवळ समिती असू शकते. त्याचा ट्रस्ट करून जामा मशीद पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण आम्ही कदापि तसे करू देणार नाही व जामा मशिदीच्या नियमानुसार त्यांना तसे करता येत नसल्याचे अब्दुल गफुर खान यांनी सांगितले. जामा मशिदीवरून राजकारण करू नये सर्वांच्याच श्रद्धेचे हे ठिकाण आहे, असेही यावेळी अब्दुल खान यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Forex Reserve Record: भारताच्या परकीय चलन साठ्याने रचला इतिहास! फॉरेक्स रिझर्व्ह 785 अब्ज डॉलर पार; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Horoscope 12 September 2026: सूर्याचं नक्षत्र बदलताच 'या' राशींचं चमकणार भाग्य, शनिवार ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

SCROLL FOR NEXT