Drinking Water Supply Policy Goa Dainik Gomantak
गोवा

PWD Goa: फक्त एका एक्लिवर मिळणार पिण्याच्या पाण्याचे सर्व अपडेट्स; PDW ची गोवेकरांसाठी नवीन उपाययोजना

Drinking Water Supply Policy Goa: बांधकाम विभाकडून पिण्याच्या पाण्याबाबत एक धोरण निश्चित करण्यात आले आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोबाईल ॲपद्वारे पाणी पुरवठ्याबाबत माहिती दिली जाणार आहे. बांधकाम विभाकडून पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत एक धोरण निश्चित करण्यात आले असून याअंतर्गत पाणी व्यवस्थापनाचा एकूण आराखडा तयार करण्यात आलाय, यामध्ये पिण्याच्या पाण्याची दुरुस्ती आणि देखभाल इत्यादी घटकांचा समावेश होतो.

नवीन उपाय योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत दुरुस्तीच्या सूचना असल्यास त्या पंचायतींना किंवा नगरपालिकांना मोबाईल ॲपद्वारे दिल्या जातील. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यास किंवा आणखीन काही अडचण निर्माण झाल्यास नगरपालिका तसेच ग्रामपंचायतींना एक विशेष टीम तयार करून हा प्रश्न सोडवावा लागेल.

येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पाणी पुरवठ्याच्या शाखांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुधारणारा एक आराखडा बनवून मुख्य अभियंत्यांच्या नजरेस आणून द्यावा लागेल. तसेच आता लवकरच प्रत्येक पंचायत, नगरपालिका आणि पणजी महानगरपालिकेत पाणी पुरवठ्याच्या देखभालीसाठी समित्या स्थापन केल्या जाणार आहेत आणि या समित्यांना नगरविकास संचालनालय तसेच पंचायतींचे सहकार्य मिळेल.

नवीन उपाय योजनेअंतर्गत राज्यातील नगरपालिका आणि पंचायतींना पाण्याच्या तपासणीसाठी किट दिले जातील. पाण्याचा वापर करणाऱ्या सर्व कुटुंबांनी पाण्याचा अपव्यय टाळायचा आहे, तसेच वापरकर्त्यांना नोंदणीकृत टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची खात्री करून घ्यावी लागेल.एखाद्या भागात नवीन योजना राबवायची असल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका किंवा पंचायतींना सूचना देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Visarjan Tragedy: तेलंगणात गणेश विसर्जनाला गालबोट; पोलीस उपनिरीक्षकासह 13 भाविकांचा दुर्देवी मृत्यू, 26 जण गंभीर जखमी

Bank Employees Strike: शनिवारच्या सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्यांची आरपारची भूमिका; 40 मिनिटे अतिरिक्त कामाची तयारी, मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप कायम

2027 च्या निवडणुकीत एकच ध्रुवीकरण हवे; '39-अ'चे समर्थक विरुद्ध '39-अ'चे विरोधक!

Lakshmi Narayanan Rajyog 2026: शुक्र-बुध युतीचा महाचमत्कार! लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावाने 'या' राशींवर होणार पैशाचा वर्षाव; संपत्तीत होणार बंपर वाढ

BSNL Tag Block Theft: 'बीएसएनएल'ला चोरांचा दणका, सासष्टीत टॅग ब्लॉकची चोरी; दूरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT