Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

'मुख्यमंत्री राजीनामा द्या' गोव्यातील सर्व पक्षांचा एकसुर

गोव्यातील स्थानिक पक्ष, विरोधीपक्षनेत्यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या राजीनाम्याच्या सुर लावून धरला

Priyanka Deshmukh

पणजी : गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी प्रमोद सावंत सरकारचे (Pramod Sawant Government) अनेकवेळा कान उपटले आणि राज्यकारभाराबद्दल जाहीरपणे नापसंती व्यक्त केली होती. त्याबद्दल त्यांना गोव्यातून (Goa) अपमानित होऊन जावे लागले होते. त्याचा आज त्यांनी पूरेपूर वचपा काढताना सावंत सरकारने कोविड प्रश्न अत्यंत निष्काळजीपणाने हाताळला, इतकेच नव्हे तर या काळात धान्य वाटपात भ्रष्टाचार झाला आणि एकूणच सर्व क्षेत्रात तेथे भ्रष्टाचाराचा भस्मासुर माजला होता, असा जाहीर आरोप सावंत सरकारवर केला आहे. या मुद्यावर पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलण्याचे टाळले.

मात्र आता गोव्याचे राजकारण तापले असून मलिक यांच्या वक्तव्याने गोव्यात खळबळ माजली आहे. राज्यातील स्थानिक पक्ष, अपक्ष आणि विरोधीपक्षनेत्यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या राजीनाम्याच्या सुर लावून धरला आहे. आप, कॉग्रेस गोवा फॉरवर्ड पक्ष आज आझाद मैदानावर धरणे करणार आहेत.

गोव्यातील अपक्षनेते रोहन खवंटे यांनीही नाराजीचा सुर लावत मुख्यमंत्री सावंत याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सत्यपाल मलिक यांनी भ्रष्टाचाराबाबत सावंत सरकारवर टीका केली. राज्यपालांनी केलेली टीका गंभीर असून, सरकारविरोधात आम आदमी पक्ष आंदोलन करायला सज्ज झाला आहे. आपने आजपासून गोवा आपकडून कालपासूनच #ResignPramodSawant हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

सत्यपाल मलिक हे सदैव गोव्याच्या लोकांसाठी उभे राहिले. त्यांनी सत्याची वाच्यता केली आणि भाजपा गोवा सरकार अगदी उघडे पडले. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना एका घटनात्मक प्रमुखाकडून करण्यात आलेल्या या पर्दाफाशनंतर सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही केली आहे. आज गोवा पणजीतील आझाद मैदानावर साडे चार वाजता कॉंग्रेस निदर्शने करणार आहे.

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्यात कोविड काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे. भ्रष्टाचाराची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली होती मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. या भ्रष्टाचारामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्यक्ती आहे. या भ्रष्ट मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळासह बरखास्त करण्यात यावे तसेच या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली कालबद्ध वेळेत करण्याची मागणी अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी आज पणजीतील काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्र्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही - राष्ट्रवादी

कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात गोवा सरकार पैसे गोळा करत होते. ऑस्किजन टॅमक GMC मध्ये असतानाही रूग्णांपर्यंत ते पोहचले नाही. कोविड लसिकरण खरेदी मध्ये ही भ्रष्टाचार झाला आहे हे गोव्याचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केल्याने आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय बर्डे यांच्याकडूनही करण्यात आली आहे.

दुपारी साडे तीनच्या दरम्यान गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार आणि अध्यक्ष विजय सरदेसाई राज्यपाल श्री पिल्लई यांची भेट घेणार आहे. मुख्यंमंत्री सावंत यांच्या राजिनाम्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतांना दिसत आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत या मुद्यावरून राजकारण तापणार हे नक्की.

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना कुणी वाचाळ म्हणोत. कुणी अस्वस्थ आत्मा म्हणून त्यांची संभावना करोत, पण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारवर त्यांनी केलेले ताजे आरोप अत्यंत गंभीर आहेत. मलिक हे अद्यापही देशाच्या गृहमंत्रालयाच्या सेवेत आहेत. गोव्यात ते काहीजणांना डोईजड व्हायला लागल्यामुळे त्यांना थेट इशान्येकडील मिझोराम राज्यात पाठवण्यात आले, तरी ते तिथे राज्यपालपदीच आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले विधान गृहखात्याच्या व अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या अनुमतीनेच केल्याचा अर्थ निघू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT