Goa Mining | Mining in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : एका महिन्याच्या आत सर्व खाणी सोडाव्यात!

खनिज खात्याचा आदेश ः 159 जुन्‍या लीजधारकांना नोटिसा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mining तीन वर्षांपूर्वी मुदत संपूनही राज्यातील जुन्‍या 159 खनिज लीजधारकांनी अद्याप खाणींवरचा ताबा सोडलेला नाही. यासाठी खनिज खात्‍याने आता त्यांना एक महिन्याची मुदत देत या सर्व खाणी त्वरित खाली करा, अशी अंतिम नोटीस बजावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार, सर्व खाणींवर राज्य सरकारचा ताबा असून, यापुढे या सर्व खाणी राज्य सरकार चालवेल (ऑपरेट) असा आदेश दिला असतानाही राज्यातील सुमारे 159 खाण लीजधारकांनी अद्यापही खाणींवरचा ताबा न सोडता तेथे मशिनरी आणि इतर साहित्य ठेवले आहे.

यापूर्वी खनिज खात्याने ‘एमएमआरडी’ कायद्यांतर्गत मशिनरीसह लीज ताब्यात घेण्याचा इशाराही दिला होता. तरीही जुन्‍या लीजधारकांनी खाणींवरचा ताबा सोडला नव्हता. म्हणून खात्याने आता 3 एप्रिल 2023 रोजी नवा आणि अंतिम आदेश जारी केला आहे.

...तर ताबा घेणार

जुन्‍या लीजधारकांनी एका महिन्याच्या आत जागा न सोडल्‍यास सरकार सर्व मालमत्ता आणि भाडेपट्टे ताब्यात घेईल आणि प्रकारची भरपाई न देता किंवा त्यासंदर्भात लीज धारकांना विचारात न घेता मालमत्तेची विल्हेवाट लावू शकते, असे नव्या आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT