CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : येत्या वर्षभरात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांचं नुतनीकरण

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा; शाळांनाही हुतात्म्यांची नावं देणार

आदित्य जोशी

CM Pramod Sawant : येत्या वर्षभरात गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांचं नुतनीकरण करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्र्यांनी गावातील शाळांना तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांची नावं दिली जाणार असल्याचं जाहीर केलं. तसंच अमृतमहोत्सवी वर्षात हुतात्म्यांच्या कार्याला उजाळा देणार असल्याचंही ते म्हणाले.

या वर्षात आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जाणार असून राज्यभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. मागील वर्षी गोवा मुक्तीची 60 वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने राष्ट्रपतींच्या हस्ते आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली होती आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमाची सांगता केली होती. 1955 सालापासून ज्या स्वातंत्र्ययोद्ध्यांनी गोवा मुक्तीसाठी लढा दिला त्या जवळपास 30 हून अधिक हुतात्म्यांची नावं शाळांना दिली जातील, तसंच त्यांच्या स्मारकांचं नुतनीकरणही केलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

सर्व तालुक्यांमध्ये सरकारच्या वतीने हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांना मानपत्रही प्रदान करण्यात आलं आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी गोव्याला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. ज्यांनी बलिदान दिले आहे, ते कधी वाया जाणार नाही, असे म्हटले आहे. राज्यातील जे स्वातंत्र्यसेनानी आहेत. त्यांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना प्रतिनिधींच्याद्वारे विशेष सन्मानपत्रे देत सन्मानित केले आहे. त्यामुळे सर्वांच्या स्मृती जाग्या झाल्या, असे ही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: '25 लाखांचा हप्ता आणि 25 बळी', लाचखोरीमुळे निष्पापांचा गेला जीव, खासदार विरियातोंचा दावा; सरकारला धरले धारेवर

Crime News: बुरख्यावरुन वाद अन् तिहेरी हत्याकांड! चहा बनवताना बायकोच्या डोक्यात झाडली गोळी, आवाज ऐकणाऱ्या चिमुकल्या मुलींनाही नराधम बापानं सोडलं नाही

Cameron Green: 25 कोटींचा 'किंग' शून्यावर आऊट! IPL लिलावात इतिहास रचणाऱ्या कॅमेरुन ग्रीनची दुसऱ्याच दिवशी फजिती; सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

Goa News Live: हडफडे आग प्रकरण: लुथरा बंधूंना म्हापसा न्यायालयात केले हजर

SCROLL FOR NEXT