Santosh Trophy 2023 Dainik Gomantak
गोवा

Santosh Trophy 2023: संतोष करंडक पात्रता फेरी गोव्यात; गोव्यासमोर केरळचे खडतर आव्हान

स्पर्धेची अंतिम साखळी फेरी अरुणाचल प्रदेश येथे खेळली जाईल.

किशोर पेटकर

Santosh Trophy 2023: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation) 77 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीची गटवारी जाहीर केली असून ‘अ’ गटातील सामने गोव्यात होणार आहेत. या फेरीत गोव्यासमोर केरळचे खडतर आव्हान असेल.

स्पर्धेची अंतिम साखळी फेरी अरुणाचल प्रदेश येथे खेळली जाईल. गट पातळीवरील स्पर्धा 6 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत खेळली जाईल. एकूण 36 सहभागी संघांची सहा गटात विभागणी करण्यात आली आहे. इतर गट साखळी सामने पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, सेनादल, महाराष्ट्रात खेळले जातील.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एफसी गोवा संघ आयएसएल सामने खेळणार आहे, त्यामुळे संतोष करंडक पात्रता फेरीतील सामने म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर खेळविण्याबाबत गोवा फुटबॉल असोसिएशन (जीएफए) विचार करत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. या स्पर्धेच्या कालावधीत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा खंडित होईल.

गतमोसमात अपयश

संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत 2022-23 मोसमात गोव्याने पात्रता फेरीचा अडथळा पार करत मुख्य फेरी गाठली होती, पण तेव्हा पाचही सामने गमवावे लागले होते. स्पर्धेच्या मुख्य फेरीत गोव्याने फक्त चार गोल नोंदविले, तर तब्बल चौदा गोल स्वीकारले होते. गोव्याने संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद, तर आठ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. शेवटचे विजेतेपद 2008-09 मोसमात मिळविले, तर 2016-17 मध्ये अखेरचे उपविजेतेपद मिळविले होते.

स्पर्धेच्या पात्रता फेरीची गटवारी

अ गट (गोव्यात): केरळ, गोवा, छत्तीसगड, गुजरात, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, ब गट (पंजाबमध्ये): पंजाब, हरियाना, ओडिशा, दिल्ली, लडाख, पश्चिम बंगाल, क गट (उत्तर प्रदेशमध्ये): मणिपूर, झारखंड, तमिळनाडू, नागालँड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ड गट (आसाममध्ये): रेल्वे, बिहार, चंडीगड, राजस्थान, आसाम, हिमाचल प्रदेश, ई गट (सेनादल): सेनादल, उत्तराखंड, मिझोराम, पुदुचेरी, सिक्कीम, दादरा-नगरहवेली आणि दमण-दीव, फ गट (महाराष्ट्रात): महाराष्ट्र, तेलंगण, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, त्रिपुरा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT