Goa Panchayat Election News Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील पंचायत निवडणुकीच्या तारखेवर सर्वांचे लक्ष

तर्कवितर्कांना उधाण: आरक्षण जाहीर न झाल्यामुळे इच्छुकांची ‘कुचंबणा’

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: राज्यातील पंचायत निवडणूक 4 जूनला होणार असे पूर्वी जाहीर झाले होते आणि त्याप्रमाणे पंचायतीतील अनेक इच्छुक नवरदेव बोहल्यावर चढण्याच्या तयारीला लागले होते. पण, आता या निवडणुका पुढे गेल्यात जमा असल्यामुळे या नवरदेवाच्या उत्साहावर थोडेसे पाणी पडल्यासारखे झाले आहे. सगळ्यांचे लक्ष आता पंचायत निवडणुकीच्या तारखांवर लागले असून तर्कविर्तकांना उधाण यायला लागले आहे. (Goa Panchayat Election News)

फोंडा तालुक्यात एकूण 19पंचायती असून, त्यातील उसगाव गांजे ग्रामपंचायत ही वाळपई मतदारसंघात मोडते. इतर 18 पंचायती या फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघात मोडत असल्यामुळे चारही आमदारांचे लक्ष या निवडणुकीच्या तारखांवर लागले आहे. अधिक लक्ष केंद्रीत झाले आहे ते आरक्षणावर. एखादा प्रभाग महिलांकरिता राखीव केल्यास आपल्या पत्नीला रिंगणात उतरविण्याची तयारी काही इच्छुक उमेदवारांनी सुरू केली आहे. फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघात मंत्री असल्यामुळे या मंत्र्याची ‘मेहेर नजर’ आपल्याकडे वळावी म्हणूनही इच्छुक उमेदवारांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडणुका होणार नसल्यातरी आपले खास कार्यकर्ते निवडून यावे या दृष्टीने प्रत्येक मंत्री रणनीती आखताना दिसत आहेत. काही मंत्र्यानी आपले वजन वापरून आपल्या कार्यकर्त्यांना हवे तसे प्रभाग करून दिल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT